राज्यभरात दहीहंडीचा उत्साह: मुंबई, ठाण्यात रंगणार थरांचा थरार; दादरमध्ये महिला गोविंदानी दिली 5 थर रचत सलामी

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह: मुंबई, ठाण्यात रंगणार थरांचा थरार; दादरमध्ये महिला गोविंदानी दिली 5 थर रचत सलामी


मुंबई22 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जन्माष्टमीचा सण आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये काल मध्यरात्रीपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील अनेक भागात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. मुंबईत सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष दिसून येतोय. दादरमध्ये साईदत्त मित्रमंडळ आयोजित दहीहंडीला महिला गोविंदा पथकाने 5 थर लावत सलामी दिली.

Advertisement

LIVE UPDATE

  • मागाठाणे तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आमदार प्रकाश सुर्वे , राज प्रकाश सुर्वे याच्या वतीने भव्य दिव्य दहीकाला आयोजन करण्यात आले आहे याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार याठिकाणी उपस्थित राहणार आहे. या ठिकाणी कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत.
  • ठाण्यातील मानाची हंडी आनंद दिघे यांनी सुरुवात केली होती. टेंभी नाका इथे पहिल्या गोविंदा पथकाचे आगमन झाले आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना त्या पावसाचा आनंद घेत हे पथक ठाण्यात दाखल झालं आहे. मुलुंड येथील साईराज गोविंदा पथकाचे गोविंदा सलामी देण्यासाठी सज्ज आहेत. पाऊस कोसळत असला तरी त्यांच्या उत्साह कुठेही कमी झालेला नसून या मानाच्या हंडीच्या ठिकाणी सलामी देणे हेच आम्ही मानाचं समजतो अशी भावना गोविंदा व्यक्त करत आहेत.
  • आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाधी मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला असून समाधीवर श्रीकृष्णाचा अवतार रेखाटण्यात आला होता. भाविकांनी जन्माष्टमीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मंदिर परिसरामध्ये गर्दी केली होती. रात्री दहा ते बारा या वेळेमध्ये हभप डॉ. नारायण महाराज जाधव यांचे कीर्तन झाले, तर गोकुळ पूजा विश्वस्त ॲड विकास ढगे यांच्या हस्ते करण्यात आली.
  • मुंबईत साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर बेस्ट बसेसच्या मार्गात बदल करण्यात आलाय. अंधेरी, रावळपाडा, कन्नमवार नगर, मानखुर्द अशा अनेक दहीहंडीचे मंडप बांधल्यामुळे बेस्टचे मार्ग वळवण्यात आलेत.
  • दहिहंडीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशांनुसार संभाव्य गरज लक्षात घेऊन महानगरपालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • नागपुरात बडकस चौक मित्र परिवारातर्फे गोकुळाष्टनिमित्त आयोजित दहीहंडी स्पर्धेत आठ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला. दहीहंडी फोडण्यासाठी थरांचा थरार सुरु होता. यावेळी गोविंदा पथकांची दहीहंडी फोडण्याची ही चुरस पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. सहा थरावर दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही काही वेळ उपस्थित होते.
  • पुण्यात आज दहीहंडी उत्सव निमित्ताने प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आलाय…शहराच्या मध्य भागातील शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता परिसरातील वाहतूक संध्याकाळी 5 ते दहीहंडी संपेपर्यंत वाहतूक वळविण्यात आली आहे.



Source link

Advertisement