राजेश टोपेंची पत्रकार परिषद: राज्यात 1.73 लाख अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण असले तरीही केवळ 1 टक्का आयसीयूत; औरंगाबादेत लसीकरण सर्वात कमी


Advertisement

13 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण कमी

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दोन ते तीन दिवसांपासून 40 हजारांच्यावर रुग्ण वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी पुन्हा सतर्कता बाळगळ्याचे आवाहन केले आहे. तसेच दिसालाही दिला आहे. राज्यात 1.73 लाख अ‍ॅक्‍टिव्ह रुग्ण असले तरीही केवळ 1 टक्का आयसीयूमध्ये आहे, अशीही माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

Advertisement

काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?

राज्यात एकूण अ‍ॅक्‍टिव्ह 1 लाख 73 रुग्ण हजार आहेत. मात्र, यामधील प्रामुख्याने आयसीयूमध्ये असलेले 1 हजार 711 रुग्ण आहे. म्हणजेच आयसीयूत असलेले 1 टक्का रुग्ण आहे. त्यापैकी ऑक्सिजनवर असलेले 5400 रुग्ण आहेत.

Advertisement

उपलब्धतेच्या तुलनेत ऑक्युपाइड बेड खूप कमी आहे.व्हेंटिलेटर बेडवर 16 हजारांपैकी 700 लोक उपचार घेत आहेत. कुठलाही ताण नाही, मुख्यमंत्र्यांना निदर्शनास आणून दिले. तसेच आरोग्यमंत्र्यांनी टेस्टिंग वाढवा, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटवर आणि व्हॅक्सीनेशनवर भर द्या, असेही आवाहन सर्व जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये असताना 7 दिवसांच्या कालावधीत त्यांच्याकडे कॉल सेंटरवरून पहिला, पाचवा आणि सातव्या दिवशी कॉल गेला पाहिजे. कुठलीही अडचण असेल तर तो कॉल सेंटरच्या लक्षात येईल. रुग्णालयाची गरज पडल्यास दाखल केले जाईल.

Advertisement

भारत सरकारने सांगितले की, तुमच्याकडे किती आणि कशा प्रकारचे बेड आहेत. त्याचे फंक्शनिंग करून घ्या. कार्यान्वित आहेत की नाही चेक करून घ्या. 523 पैकी 404 ऑक्सिजन प्लांट सक्रिय, 8 दिवसांत उर्वरीतही दुरुस्त केले जाईल. उपचारासाठी सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. केंद्राला माहिती दिलेली आहे, अशीही राजेश टोपे यांनी माहिती दिली.

( ईसीआरटी-2 ) एमर्जंन्सी कोविड रिस्पॉन्स-2 हा निधी केंद्राने दिला. ठराविक कामानिमित्त हा देण्यात येतो. आम्ही प्रस्ताव पाठवले होते. आज मी मंत्री महोदयांना सांगितले की, आमच्या लेव्हलला गरजेप्रमाणे खर्च करता यावे, अशी परवानगी केंद्रीय मंत्र्यांकडे मागितली होती. त्यांच्याकडून मंजूर झाली आहे. निश्चित प्रमाणे दिलेल्या निधीनुसार टेंडर काढले गेले आहे. त्याचे आता कामेही सुरु झाली आहे.

Advertisement

व्हॅक्सीनेशनमध्ये महाराष्ट्राने अधिक चांगल्या प्रकारे काम करावे, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्या पद्धतीने कडक पद्धतीने समज देऊन त्यांचे व्हॅक्सीनेशन करण्याच्या सूचना दिल्या.

15+, प्रौढ नागरिकांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे अशा तिन्ही प्रकारचे लसीकरण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. आणखी चांगले करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

औरंगाबादमध्ये व्हॅक्सीनेशनचे प्रमाण कमी

केंद्राने एकूण जिल्ह्यांची यादी तयार केली. औरंगाबादमध्ये लसीकरणाच्या संथ गतीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी व्हॅक्सीनेशन चांगले, त्या ठिकाणी हॉस्पिटलायजेशन कमी. मृत्यू कमी. त्यामुळे व्हॅक्सीनेशनवर भर द्या, अशा सूचना केंद्राने दिल्या आहेत. अतिशय सतर्क राहून लसीकरण करावे अशा सूचना आम्ही देखील राज्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement