राजस्थान रॉयल्सने आजचा सामना जिंकत गुणतालिकेत भरले गुलाबी रंग; १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप

राजस्थान रॉयल्सने आजचा सामना जिंकत गुणतालिकेत भरले गुलाबी रंग; १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप
राजस्थान रॉयल्सने आजचा सामना जिंकत गुणतालिकेत भरले गुलाबी रंग; १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप

डबल हेडरमधील दुसरा सामना लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला हा सामना उभय संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. राजस्थानने या सामन्यात लखनौला २४ धावांनी पराभूत केले. राजस्थानचा हा हंगामातील आठवा विजय होता. यासह त्यांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झाले आहे.

राजस्थान रॉयल्सचे १७९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या लखनौ सुपर जायंटची सुरूवात खराब झाली. ट्रेंट बोल्टने तिसऱ्या षटकात क्विंटन डिकॉक (७) आणि आयुष बदोनीला (०) पाठोपाठच्या चेंडूवर बाद करत लखनौला दोन धक्के दिले. त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने केएल राहुलला १० धावांवर बाद करत लखनौची अवस्था ३ बाद २९ अशी केली. यानंतर आलेल्या दीपक हुड्डा आणि क्रुणाल पांड्या यांनी चौथ्या विकेटसाठी अर्शतकी भागीदारी रचली. दीपक हु़ड्डा आक्रमक फलंदाजी करत होता. तर क्रुणाल त्याला सावध खेळत साथ देत होता.

मात्र आर. अश्विनने ही जोडी फोडली. त्याने क्रुणाल पांड्याला २५ धावांवर बाद केले. त्यानंतर दीपक हुड्डाने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र युझवेंद्र चहलने ३९ चेंडूत ५९ धावा करणाऱ्या दीपक हुड्डाला बाद करत लखनौला पाचवा आणि मोठा धक्का दिला. त्यानंतर मॅकॉयने देखील होल्डरला १ धावेवर पॅव्हिलयनचा रस्ता धरायला लावला. त्यानंतर त्याच षटकात दुष्मंथा चमीराला शुन्यावर बाद करत लखनौच्या अडचणीत वाढ केली.

आयपीएलच्या ६३ व्या सामन्यात आज प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला लखनौ सुपर जायंटने पॉवर प्लेमध्येच मोठा धक्का दिला. आवेश शानने फॉर्ममध्ये असलेल्या जॉस बटलरचा अवघ्या दोन धावांवर त्रिफळा उडवून दिला. मात्र त्यानंतर सलामीवीर यशस्वी जैसवाल आणि संजू सॅमसन यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला पंचाहत्तरी पार करून दिली. मात्र होल्डरने ही जोडी फोडली. त्याने संजू सॅमसनला ३२ धावांवर बाद कले. त्यानंतर आयुष बदोनीने राजस्थानला तिसरा धक्का दिला. अर्धशतकाच्या जवळ पोहचलेल्या यशस्वी जैसवालला ४१ धावांवर बाद केले. त्यानंतर पडिक्कलने आक्रमक फलंदाजी करत संघाला शतक पार करून दिले. मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. रवी बिश्नोईने त्याला ३९ धावांवर बाद केले.

Advertisement

दरम्यान, रियान पराग १९ आणि जेम्स निशम १४ धावांची भर घालून बाद झाले. त्यानंतर रवीचंद्रन अश्विन (१०) आणि ट्रेंट बोल्ट (१७) यांनी आक्रमक फलंदाजी करत संघाला १७८ धावांपर्यंत पोहचवले. लखनौकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक २ बळी टिपले.

Advertisement