राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराने सांगितले आर.अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचे कारण, काय आहे वाचा…

राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराने सांगितले आर.अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचे कारण, काय आहे वाचा...
राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराने सांगितले आर.अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचे कारण, काय आहे वाचा...

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात २४ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात पार पडला. या सामन्यात गुजरात लायन्सने ३७ धावांनी विजय मिळवला. हा गुजरातचा चौथा विजय ठरला आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने या सामन्यात फलंदाजीदरम्यान मोठा बदल केलेला दिसला. त्याबद्दल आता राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यात गुजराजने दिलेल्या १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान संघाने तिसऱ्या क्रमांकावर आर अश्विनला बढती दिली होती. खरंतर या क्रमांकावर बऱ्याचदा संजू सॅमसन फलंदाजी करतो. पण तो या सामन्यासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र, या योजनेचा मोठा फायदा राजस्थानला झाला नसल्याचे दिसले. कारण अश्विन ८ धावा करून, तर सॅमसन ११ धावा करून बाद झाला.

Advertisement

सामन्यानंतर सॅमसनने सांगितले की, ‘मी गुजरातच्या फलंदाजांना विजयाचे श्रेय देईल. हार्दिक पंड्याने चांगला खेळ केला. डेव्हिड मिलरने शानदार कामगिरी केली. जर आमच्या हातात विकेट असत्या, तर आव्हानाचा पाठलाग पूर्ण होऊ शकला असता. धावगती आणि काही विकेट्सने फरक पडला. पण आमच्याकडे क्षमता होती.’अश्विनला फलंदाजीत बढती देण्याबद्दल सॅमसन म्हणाला, ‘फलंदाजी क्रमाबाबत खुप विचार प्रक्रिया सुरू आहे. मी खूप काळ झाले तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे. मी मागच्या हंगामातही तिसऱ्या क्रमांकावर खेळलो. आम्हााल वाटले की मला खालच्या क्रमांकावर फलंदाजीला यायला पाहिजे आणि थोडे लवचिक व्हायला पाहिजे. मी कुठेही फलंदाजी करुन खुश आहे आणि संघाच्या गरजेनुसार फलंदाजीचा क्रम ठरत असतो.’

या सामन्यात राजस्थानने वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला देखील अंतिम ११ जणांमध्ये खेळवले नाही. याबद्दल सॅमसन म्हणाला, ‘हे थोडे विचित्र होते आणि आम्हाला पॉवर प्लेच्या षटकांमध्ये ट्रेंट बोल्टचा अनुभवाची कमी जाणवली. आशा आहे की, तो लवकरच पुनरागमन करेल. हार्दिकसाठी आजचा दिवस खूपच चांगला होता. मला पुरेसे आयपीएल खेळून हे समजले आहे की, प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण असतो. पराभवातून शिकणे आणि मजबूतीने पुनरागमन करणे महत्त्वाचे असते.’

Advertisement

गुजरातने जिंकला सामना

या सामन्यात गुजरातने २० षटकात ४ बाद १९२ धावा केल्या. त्यांच्याकडून कर्णधार हार्दिकने ५२ चेंडूत नाबाद ८७ धावा केल्या. तसेच अभिनव मनोहरने ४३ धावा केल्या. राजस्थानकडून युजवेंद्र चहल, कुलदीप सेन आणि रियान पराग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Advertisement