राजस्थानने आजच्या सामन्यात सिद्ध केले की आम्हीच रॉयल्स आहोत, २९ धावांनी बंगळूरचा पराभव

राजस्थानने आजच्या सामन्यात सिद्ध केले की आम्हीच रॉयल्स आहोत, २९ धावांनी बंगळूरचा पराभव
राजस्थानने आजच्या सामन्यात सिद्ध केले की आम्हीच रॉयल्स आहोत, २९ धावांनी बंगळूरचा पराभव

रॉयल चॅलेंजर बेंगलोरला राजस्थान रॉयल्सने ठेवलेले १४५ धावांचे माफक आव्हान पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ ११५ धावात माघारी गेला. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळण्यात आला. या सामन्यात राजस्थान संघाने २९ धावांनी विजय मिळवला. हा राजस्थानचा हंगामातील सहावा विजय होता. या विजयात गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही मोलाचे योगदान दिले. फलंदाजीत राजस्थानकडून रियान परागने झुंजार खेळ करत ५६ धावांची खेळी केली. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आरसीबीकडून कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने सर्वाधिक २३ धावा केल्या. अश्विनने शाहबाज अहमदला आणि कुलदीपने वानिंदू हसरंगाला बाद करत आरसीबीचे तगडे फलंदाज माघारी धाडले.

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने राजस्थानला पहिला धक्का दिला. त्याने देवदत्त पडिक्कलला ७ धावांवर बाद केले. पडिक्कल बाद झाल्यानंतर राजस्थानने आर अश्विनला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आर. अश्विनला मोहम्मद सिराजने बाद केले. अश्विने ९ चेंडूत १७ धावा केल्या. अश्विन बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जॉस हेजलवूडने राजस्थानचे रन मशिन जॉस बटलरला बाद केले. बटलरने ९ चेंडूत ८ धावा केल्या. जॉस बटलर बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे आपल्या हातात घेत आक्रमक फलंदाजी करणाऱ्या संजू सॅमसनला हसरंगाने बाद केले. संजूने २१ चेंडूत २७ धावांची खेळी केली.

पण एका बाजूने विकेट्स पडत असताना राजस्थानचे एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी जात असताना रियान परागने एक बाजू लावून धरली त्याने शेवटच्या दोन षटकात आक्रमक फटकेबाजी करत २९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३१ चेंडूत केलेल्या ५६ धावांमुळे राजस्थानला १४४ धावांपर्यंत पोहचवले.

Advertisement

यावेळी बेंगलोरकडून फलंदाजी करताना कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २१ चेंडूत २३ धावा केल्या. यामध्ये १ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. याव्यतिरिक्त वनिंदू हसरंगाने १८, शाहबाज अहमदने १७, आणि रजत पाटीदारने १६ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही. ग्लेन मॅक्सवेल तर शून्य धावेवर तंबूत परतला. यावेळी राजस्थानकडून गोलंदाजी करताना आर अश्विन आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. त्यांच्याव्यतिरिक्त प्रसिद्ध कृष्णाला २ विकेट्स घेण्यात यश आले.

Advertisement