राजस्थानच्या राजवाड्यांनी आजचा सामना जिंकत प्ले-ऑफ शर्यतीत आपले स्थान जवळपास निश्चित

राजस्थानच्या राजवाड्यांनी आजचा सामना जिंकत प्ले-ऑफ शर्यतीत आपले स्थान जवळपास निश्चित
राजस्थानच्या राजवाड्यांनी आजचा सामना जिंकत प्ले-ऑफ शर्यतीत आपले स्थान जवळपास निश्चित

राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचे १९० धावांचे आव्हान ४ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. राजस्थान आता १४ गुण घेऊन प्ले ऑफच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले. राजस्थानकडून यशस्वी जैसवालने सर्वाधिक ६८ धावा केल्या. त्याला देवदत्त पडिक्कलने ३१ तर शिमरॉन हेटमायरने १५ चेंडूत ३१ धावा करत चांगली साथ दिली. राजस्थानकडून गोलंदाजीत युझवेंद्र चहलने ३ विकेट घेतल्या.

पंजाब किंग्जने ठेवलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जैसवाल आणि जॉस बटलर यांनी आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. बटलर आक्रमक फलंदाजी करत होता. ४७ धावांच्या सलामीत त्याच्या एकट्याच्या ३० धावा होत्या. कसिगो रबाडाने ३० धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला कर्णधार संजू सॅमसनला मोठी खेळी करण्यात अपयश आले. संजू सॅमसनला ऋषी धवनने २३ धावांवर बाद केले. बटलर आणि संजू सॅमसन हे आक्रमक फलंदाज लवकर माघारी गेल्यानंतर सलामीवीर यशस्वी जैसवालने चांगली झुंज देत अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे राजस्थानने शतकी मजल मारली.

यशस्वी जैसवालने ४१ चेंडूत ६८ धावा चोपून सामन्याचे पारडे राजस्थानकडे झुकवले. मात्र १५ व्या षटकात अर्शदीपने त्याला बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला. यशस्वी बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल आणि शिमरॉन हेटमायरने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी सामना बॉल टू रन असा आणला. अखेर अर्शदीपने ३२ चेंडूत ३१ धावा करणाऱ्या पडिक्कलला बाद केले. त्यामुळे सामना ६ चेंडूत ८ धावा असा आणला. शेवटचे षटक टाकण्यासाठी कर्णधार मयांकने राहुल चहरला पाचारण केले. त्याने पहिलाच चेंडू वाईड टाकत सामना ६ चेंडूत ७ धावा असा आणला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर हेटमायरने षटकार मारत सामना राजस्थानच्या पारड्यात टाकला. त्यानंतर विजयी धाव चौथ्या चेंडूवर घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने १५ चेंडूत आक्रमक ३१ धावा केल्या.

Advertisement

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जने चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवन यांनी ४७ धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर राजस्थानने पंजाबला एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरूवात केली. पहिला धक्का अश्विनने धवनच्या (१२) रूपात दिला. त्यानंतर आलेल्या राजपक्षे आणि बेअरस्टोने भागीदारी रचण्याच प्रयत्न केला. मात्र युझवेंद्र चहलने आपला जवला दाखवत २७ धावा करणाऱ्या भानुका राजपक्षेचा अडसर दूर केला. दरम्यान, जॉनी बेअरस्टोने आपले अर्धशतक पूर्ण केले होते.

त्यानंतर युझवेंद्र चहलने १५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कर्णधार मयांक अग्रवालला १५ धावांवर बाद करून अजून एक धक्का दिला. पाठोपाठ चौथ्या चेंडूवर ५६ धावा करणाऱ्या बेअरस्टोची शिकार करत पंजाबची अवस्था ४ बाद ११९ धावा अशी केली. पंजाबच्या पाठोपाठ विकेट पडत असताना जितेश शर्मा आणि लिम लिव्हिंगस्टोनने अर्धशतकी भागीदारी रचत संघाला १७० धावांच्या जवळ पोहचवले.

Advertisement

मात्र १९ व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने लिव्हिंगस्टोनला २२ धावांवर बाद केले. त्यानंतर जितेश शर्माने फटकेबाजी करत १८ चेंडूत ३८ धावा केल्या. या जोरावर पंजाबने २० षटकात १८९ धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून युझवेंद्र चहलने २८ धावात ३ विकेट घेतल्या. तर अश्विन आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी १ विकेट घेतली.

Advertisement