राजवाड्यांनी आज नवाबंना हरवत आम्हीच टॅासचे बॉस असे काही नसते असे दाखवून दिले

राजवाड्यांनी आज नवाबंना हरवत आम्हीच टॅासचे बॉस असे काही नसते असे दाखवून दिले
राजवाड्यांनी आज नवाबंना हरवत आम्हीच टॅासचे बॉस असे काही नसते असे दाखवून दिले

राजस्थान रॉयल्सने हैदराबादी बिर्याणी पचवत ६१ धावांनी विजय मिळवला. आयपीएल२०२२ मध्ये पहिल्यांदा पुण्याच्या खेळपट्टीवर धावा वाचवून दाखवल्या. नाणेफेकीवर सामन्याचा निर्णय अवलंबून नसतो असे दाखवून दिले. कर्णधार असावा तर असा असे म्हणत संजू सॅमसनने सामनावीराचा मान पटकावला. या सामन्यात नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार केन विलियम्सनने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचा हा निर्णय त्याच्यावरच उलटला.

आयपीएल हंगामातील पुण्यातील पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने धडाकेबाज फलंदाजी करत २० षटकात ६ बाद २१० धावा ठोकल्या. राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार संजू सॅमसनने तुफानी खेळी करत २७ चेंडूत ५५ धावा ठोकल्या. त्याला पडिक्कलने ४१ तर जोस बटलरने ३५ धावा करून चांगली साथ दिली. त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये हेटमायरने हाणामारी करत १३ चेंडूत ३२ धावा करत राजस्थानला २००च्या पार पोहचवले.

हैदराबाद २१० धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरल्यानंतर त्यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र राजस्थान रॉयल्सच्या प्रसिद्ध कृष्णा आणि ट्रेंट बोल्डने नवीन चेंडूवर हैदराबादला हादरे दिले. प्रसिद्ध कृष्णाने कर्णधार केन विलयमसन आणि राहुल त्रिपाठीला बाद करत हैदराबादची अवस्था २ बाद ७ धावा अशी केली. त्यानंतर ट्रेंट बोल्टने निकोलस पूरनला शुन्यावर बाद करत तिसरा आणि मोठा धक्का दिला.यानंतर हैदराबादला सारताच आले नाही. चहलने अभिषेक शर्मा आणि अब्दुल समादला स्वस्तात बाद करत अजून दोन धक्के दिले. अब्दुल समादला युझवेंद्र चहलने फिरकीच्या जाळ्यात अडकवले. हैदराबादचा निम्मा संघ ३७ धावातच पॅव्हेलियनमध्ये पोहचला होता.

Advertisement

कर्णधार नेमका कसा असावा, याचे उत्तम उदाहरण राजस्थानच्या संजू सॅमसनने आज दाखवून दिले. फलंदाजीला आल्यावर कसलेही दडपण न घेता संजूने धडाकेबाज फटकेबाजीला सुरुवात केली. फक्त २५ चेंडूंत त्याने षटकारासह संजूने अर्धशतक साकारले. संजूच्या या भन्नाट खेळीच्या जोरावरच राजस्थान रॉयल्सला सनरायझर्स हैदराबादपुढे मोठे आव्हान ठेवता आले. संजूला अन्य फलंदाजांनी सुयोग्य साथ दिली आणि त्यामुळेच राजस्थानला या आयपीएलमधील स्रवाधिक धावसंख्या उभारता आली. राजस्थानने यावेळी हैदराबादपुढे २११ धावांचे आव्हान ठेवले. यापूर्वी आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाने २०८ धावा केल्या होत्या.

राजस्थान रॉयल्सने आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केल्याचे पाहायला मिळाले. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त पडीक्कल यांनी हैदराबादच्या गोलंदाजीची पिसे काढली. त्यामुळे राजस्थानला हैदराबादपुढे पहिल्याच सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली. राजस्थानने यावेळी सावध सुरुवात केली होती. पण सॅमसन आणि पडीक्कल यांनी धावांचा गिअर बदलला आणि राजस्थानने मोठी धावसंख्या उभारली.

Advertisement