छत्रपती संभाजीनगर20 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
जातीचे खोटे प्रमाणपत्र काढून सवलती घेणाऱ्यांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी बंजारा, राजपूत भामटा, भटके-विमुक्त समाज कृती समितीच्या वतीने बुधवारी मोर्चा काढण्यात येत आहे. या महामोर्चा साठी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले असून सरकारचे विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे याबाबत राज्य सरकारने एस.आयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात येत आहे.
23 ऑगस्ट रोजी ‘पांढरे वादळ’ महामोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून क्रांती चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली आहे.यावेळी जय सेवालाल अशी घोषणाबाजी करण्यात येत आहे.तसेच भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू आहे.
दोन तास घोषणाबाजी सुरू
या मोर्चात गेल्या दोन तासापासून क्रांती चौक मध्ये घोषणाबाजी सुरू आहे. अकरा वाजल्यापासून ही गर्दी जमा झाली आहे.यामध्ये सरकारच्या विरोधात घोणाबाजी करण्यात येत आहे. तसेच एसआयटी स्थापन करा यासह विविध मागण्या करण्यात येत आहेत. पांढरे झेंडे हाती घेत आंदोलन कर्ते घोषणाबाजी करत आहेत.यावेळी वेगवेगळ्या मागण्याचे फलक हाती घेण्यात आले आहेत
बोगस प्रमाणपत्र रद्द करा
यावेळी बोगस प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी आंदोलन कर्ते कडून केली जात आहे. सरकार आमच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांनी केला आहे. यावेळी आज.मची है चुहा शाही, बोगस भामटे भाजप भाई भाई एस आयटी स्थापन झालीच पाहिजे यासह विविध बॅनर हाती घेत आंदोलन कर्ते सहभागी झाले होते.