राजकीय: सेनेत जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच तिकीट मिळते, तरुणांना तिकिट देण्याच्या बातम्या खोट्या : आदित्य ठाकरे


Advertisement

मुंबई6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

एकीकडे देशात निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशासह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे, तर महाराष्ट्रात आगामी काळात मुंबई, ठाण्यासह १० महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर युवा सेना अध्यक्ष व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेत जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच तिकीट मिळणार, असे रविवारी (ता.९) समाजमाध्यमांवर स्पष्ट केले. मुंबई महापालिकेत यापुढील निवडणुकांसाठी तरुणांचा विचार केला जाईल, अशा बातम्या समोर आल्या होत्या. परंतु राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळते असे आदित्य यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisement

ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यात निवडणुका घेऊ नयेत, असा सूर सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेला आहे. मात्र, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यामुळे राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेळेत होतील, असा अंदाज आहे.

उद्धव ठाकरेंचेही कार्यकर्त्यांना आदेश
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांशी साधलेल्या संवादात आगामी महापालिका निवडणुकांची तयारी करण्याचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीवरून भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. मात्र, उद्धव ठाकरेंनी विरोधकांना मी योग्य वेळेत उत्तर देईन, असे म्हणत सैनिकांना तयारीचे आदेश दिले आहेत.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement