राजकीय: राज्यात जातीय सलोखा बिघडवणे चुकीचे; राज्यात हिंसाचाराच्या घटना घडायला नको होत्या- विरोधी पक्षनेते अजित पवार


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Disrupting Communal Harmony In The State Is Wrong; Incidents Of Violence Should Not Have Happened In The State Leader Of Opposition Ajit Pawar

पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

कर्नाटक निवडणुकीत बजरंगबलीला डाेळयासमाेर ठेऊन मतदान करा असे आवाहन पंतप्रधान यांनी केले. परंतु कर्नाटकात लाेकांनी तसे काही केले नाही. राज्यात अकाेला, अहमदनगर, त्र्यंबकेशवर याठिकाणी घडलेल्या अनुचित घटना घडल्या नव्हत्या पाहिजे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement

त्र्यंबकेश्वर मंदिरबाबत काही संघटना पुढे आल्या व त्यांनी गाेमुत्र शिंपडणे प्रकार केला. अनेक वर्ष चालत आलेली त्याठिकाणची परंपरा आहे, त्यावरुन जातीय सलाेखा बिघडविण्यात येऊ नये. आपली अनेक धार्मिक स्थळे, श्रध्दास्थान त्याठिकाणी लाेक आनंदाने ये-जा करतात. त्याठिकाणी लाेकांच्या मनात धार्मिक तेढ नसताे. जातीपातीच्या परंपरावरुन काेण तेढ निर्माण करत असेल तर ते चुकीचे आहे.

साेशल मिडियाच्या माध्यमातून अशाप्रकारे तेढ निर्माण काेण करत असेल तर मास्टर माइंडचा शाेध घेतला पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण करुन, दाेन समाजात दरी निर्माण करुन कायदा व सुव्यवस्था बिघडवली जाते. राज्यात शांतता राखणे हे सरकारचे काम आहे असे मत राज्याचे विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

Advertisement

विभागीय आयुक्त कार्यलाय येथे जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीत उपस्थित राहिल्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. पवार म्हणाले, जातीय सलाेखा राखण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. काही पक्षाचे लाेक वातावरण शांत करण्याऐवजी वातावरण खराब करण्याचे दृष्टीने वक्तव्य करत आहे. महागाई, बेराेजगारी, शेतकरी समस्या, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस-गारपीट संकट, शेतकरी नुकसान भरपाई आदी बाबत लक्ष्य दिले जात नाही.

शेतकऱ्यांचे कांदा, कापूस पीक अडचणीत आले , त्यास भाव मिळत नाही याबाबत सरकारने लक्ष्य दिले पाहिजे. एसटीत महिलांना अर्ध तिकिट देण्या ऐवजी दैनंदिन गॅस सिलेंडरला अनुदान द्यावे. तुळाजपूर येथे विशिष्ट पाेशाखात दर्शनास यावे याबाबत ते म्हणाले,काेणत्या देवाने सांगितले अर्धा चड्डीत आले तर दर्शन मिळणार नाही, भारतीय संस्कृती प्रमाणे वेगवेगळया धर्मात, जातीत विविध पेहराव घातला जात असताे. पेहराव याेग्य असावा याबाबत दुमत नाही. उन्हाळयाचे सुट्टीत मुलांनी हाफ पँट घालून दर्शनास गेले तर त्यांना मंदीरा बाहेर ठेवले गेले याबाबत सरकार व स्थानिक प्रशासनाने लक्ष्य घातले पाहिजे. अशाप्रकारे नवीन प्रश्न निर्माण झाले नाही पाहिजे आणि नवीन पायंडे घातले गेले नाही पाहिजे.

Advertisement

एक लाखांची बीले सरकारने देणे बाकीपवार म्हणाले,जिल्हा नियाेजन समिती निधी वाटप हाेताना सर्वांना समान वाटप झाला पाहिजे.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना विनंती केली की, सत्ताधारी पक्षाचे तुम्ही असले तरी विराेधी आमदारांना कमी निधी देऊन चालणार नाही. त्यांनी सांगितले की, अशाप्रकारे तक्रार येणार नाही याची काळजी घेताे. राज्यात अनेक काॅन्ट्रॅक्टर विविध विभागाची कामे केले सांगतात. परंतु त्यांचे एक लाख सात हजार काेटीची बीले देणे बाकी आहे. याबाबत वरील पातळीवर विचारणा केल्याशिवाय बीले देऊ नका असे सांगितले जाते. मी अर्थमंत्री हाेताे परंतु अशाप्रकारे कधी सांगितले नाही. राज्याच्या तिजाेरीवर आर्थिक ताण असेल तर तसे सरकारने स्पष्ट करावे.



Source link

Advertisement