राजकीय: राज्यात जाणीवपूर्वक दंगे भडकावण्याचा प्रयत्न, राजकीय नेत्याची कॉल रेकॉर्डिंग समोर आल्याचा सुधीर मुनगंटीवारांचा दावा


पुणे12 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्यात काही ठिकाणी जाणीवपूर्वक दंगे भडकवण्याचा प्रयत्न होत आहे अशी माहिती गृह विभागाकडे आहे. एका राजकीय नेत्याची कॉल रेकॉर्डिंगही समोर आली आहे. काही राजकीय पक्ष असे आहेत ज्यांची नावे सध्या मी घेणार नाही, असा दावा राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

Advertisement

नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात झालेल्या घटनेनंतर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याबाबत मत व्यक्त करताना सांगितले की, एका राजकीय नेत्याची कॉल रेकॉर्डिंग पहिली तर त्याने पुण्यात दंगली घडवा असे सांगितल होते. असे काही राजकीय पक्ष आहेत ज्यांचे नाव मी सध्या घेत नाही. असे राजकीय पक्ष दंगल घडवून चांगले काम करून सत्तेत येत नाही. या भावनेतून ते काम करत नाही असे, यावेळी मुनगंटीवार म्हणाले.

नव्याने प्रथा का?

Advertisement

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पुण्यात गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे भारतीय जनता पक्षाची कार्यसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होता. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, त्र्यंबकेश्वर मंदिरातली धूप दाखवण्याची प्रथा केव्हापासून सुरू आहे. याची सविस्तर माहिती घेतली गेली पाहिजे. नव्याने अशी प्रथा सुरू करून वाद निर्माण केले जात आहे का? याबाबत सत्यता तपासली पाहिजे.

पळपुटेपणा केला

Advertisement

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता ते म्हणाले, काही पक्षाच्या चेहऱ्यावर शिवाजी महाराजांचा फोटो आणी हृदयात औरंगजेबाचे विचार आहेत.यांना स्वतःच्या पक्षातील 40 माणसं टिकवता आली नाहीत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात हिंमत होती तर त्यांनी महाविकास आघाडीचे बहुमत सिद्ध करायचे होते.मात्र, ते मैदानातून पळून गेले, त्यांनी पळपुटेपणा केला. बहुमत सिध्द करण्यापूर्वी एक दिवस आधीच ते पळून गेले.

निकालावरून संभ्रम

Advertisement

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सर्वाच्च न्यायलायच्या निकालावरून संभ्रम निर्माण केला जात आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना निवडणुकीसाठी कधीही सज्ज आहे. भाजप निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन कार्यकारिणी करत नाही असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला. मंत्रिमंडळाचा विस्ताराचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेतला जाईल याबाबत राज्यातील कोणीही माहिती देऊ शकणार नाही असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.



Source link

Advertisement