राजकीय: महाविकास आघाडी सरकारला घालवण्यासाठी मला घरी बसावे लागले असते तरी मी तयार होतो – देवेंद्र फडणवीस


पुणे2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकारला घालवण्यासाठी मला घरी बसावे लागले असते तरी मी तयार होतो.मात्र, भारतीय जनता पक्षाने माझा सन्मान केला आणि मला पुन्हा राज्यात चांगले पद देऊन काम करण्याची संधी दिली आहे. महाराष्ट्र मध्ये आपण गतिशील सरकार अस्तित्वात आणले आहे असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केले.

Advertisement

पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन आणि घर चलो अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे आयोजित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे,राहुल कुल बापू पठारे, सिद्धर्थ शिरोळे,भीमराव तापकीर,चंद्रकांत पाटील,माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे मेधा कुलकर्णी ,माधव भंडारी,राजेश पांडे, जगदीश मुळीक उपस्थित होते. कार्य अहवालच्या 6.50 लाख पुस्तिका पुणेकरांच्या पर्यंत पोहोचविणार असल्याचे यावेळी पुणे भाजपकडून जाहीर करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, राज्यातील मागील विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित निवडणुका लढली. त्यानंतर जनतेने युतीला 170 जागा निवडून दिल्या. मात्र, त्या वेळेच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खुर्ची करीता आपल्याला धोका दिला. हिंदुत्वाचा विचार सोडून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ते जाऊन मिळाले.त्यानंतर राज्यात महावसुली सरकार अस्तित्वात आले.

Advertisement

महाविकास आघाडी सरकार वसुली सरकार

कोरोनाच्या काळात प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याची प्रवृत्ती महाविकास आघाडी सरकारच्या काळात पाहायला आपणास मिळाली. पुण्यातील कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार केला गेला. आम्ही त्यांच्या विरोधात न घाबरता संघर्ष केला आहे.

Advertisement

फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे

पुणे शहर भाजपचे अध्यक्ष आणि माजी आमदार जगदीश मुळीक म्हणाले, उपमुख्यमंत्री पदावर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर बसावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.पुणे मनपा वर भाजपा सेनेचाच भगवा फडकेल हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पुण्यामध्ये मनपा निवडणुकीत भाजपचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणून पुन्हा सत्ता मिळवू असा विश्वासही त्यांनी यावेळी मांडला.

Advertisement



Source link

Advertisement