राजकीय: पुण्यात महाविकास आघाडीची बैठक; आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा


पुणे14 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीची बैठक सोमवारी पार पडली. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, व शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे व संजय मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.

Advertisement

आगामी महानगरपालिका निवडणूक तिन्ही पक्षांनी मिळून एकत्रित लढण्याच्या दृष्टीने प्राथमिक चर्चा यावेळी झाली. तसेच महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची एकत्रित सभा आणि मोर्चा १६ जून रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

16 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार ,शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत लाल महाल ते मनपा असा मोर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेतील भाजपचा भ्रष्टाचार कारभार, सव्वा वर्षातील प्रशासकाच्या काळातील कोट्यावधीची बेकायदेशीर टेंडर प्रक्रिया, पाणी कपात ,नदी सुधार प्रकल्पातील विलंब आदी प्रश्नाबाबत हा मोर्चा काढला जाणार आहे. तसेच आगामी निवडणुकीत याच मुद्द्यावर भाजप विरोधात जनजागृती करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. काँग्रेस नेते मोहन जोशी म्हणाले, भाजपच्या काळातील बेकायदेशीर कामे ,भ्रष्टाचाराचा हिशोब मागण्यासाठी आणि त्याचा पर्दाफाश करण्यासाठी यापुढील काळात प्रयत्न केले जातील. महागाई ,रोजगार, पाणीपुरवठा प्रश्न याबद्दल समस्या भेटत आहे. मात्र, राजकीय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप स्वार्थी राजकारण करत आहे 2017 ते 2022 यादरम्यानच्या पुणे मनपातील भाजप कारकीर्दीची श्वेतपत्रिका मनपाने जाहीर करावी अशी आमची मागणी आहे.

Advertisement

यावेळी कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एक हाती सत्ता स्थापन केली. भारतीय जनता पक्षाला दिलेली ही चपराक आहे. देशाच्या राजकारणाला एक वेगळी दिशा देणारी ही निवडणुक ठरणार आहे. या निमित्ताने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे अभिनंदनाचा ठराव राष्‍ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मांडला. त्यास माजी महापौर कमल व्‍यवहारे व शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी अनुमोदन दिले.



Source link

Advertisement