राजकीय: नांदगाव तालुक्यातील वनविभागाच्या वादग्रस्त जमिनीबाबत शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण


नाशिक6 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नांदगाव तालुक्यातील पांझण व डाँक्टरवाडी येथील वनविभागाच्या जमीनीवर महसुल विभागाच्या परवानगीने सोसायटीच्या जागेवर सोलर प्रकल्प उभारण्यात येत होता. वनविभागाने हरकत घेत या प्रकल्पाला सील लावले आहे. तर आता या जमिनी जे शेतकरी कसत आहे.

Advertisement

त्यांच्या नावावर जमीन करावी या मागणीसाठी साकोरे (पुनर्वसाहत पांझण) येथील 13 शेतकऱ्यांनी भारतीय कम्युनिष्ट पक्ष व किसान सभेचे नेते राजु देसले यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून विभागीय महसुल आयुक्तालय येथे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.त्यामुळे महसुल, वन विभाग आणि शेतकरी यांच्या या जमिनीवरुन वाद चिघळण्याची शक्यता आहे.

नांदगाव तालुक्यातील साकोरे (पुनर्वसाहत पांझण) येथील गट क्रमांक 1 मधील वन व महसूलच्या जमिनीवर टाटा पावर सोलर प्रकल्पाचे काम कायमचे बंद करण्यात यावे, जमीन कसत असलेल्या कब्जेदार शेतकऱ्याच्या नावे जमीन करण्यात यावी, सातबाऱ्यावर नाव लागावे यासाठी उपोषण सुरु करण्यात आले आहे. शेतकरी कसत असलेल्या जमिनीजवळ संबधित कंपनीने अतिक्रमण केले असुन महसूल विभाग याबाबत स्पष्टपणे सांगत नाही.

Advertisement

जमीन कोणाची याबाबत महसुल विभागाकडे उत्तर नसेल तर मग कंपनीचे काम कसे चालू आहे? असा सवाल तयार होत आहे. याबाबत 9 महिन्यापासून नांदगाव तहसीलदार, जिल्हाधिकारी नाशिक यांना वारंवार निवेदन दिले आहे. ही जमीन कसण्यासाठी शासनाने फार्मिंग सोसायटीमार्फत भूमिहीनांना दिली असतांना सदर जमिनीची सोलर कंपनीने खरेदी कशी केली.

या प्रकरणांची चौकशी होणे आवश्यक आहे. फार्मिंग सोसायट्या अवसायनात निघाल्यानंतर नांदगाव तहसीलदारांनी 26 मार्च 1979 रोजी संस्थेला दिलेली जमीन ताब्यात घेऊन सदरी सरकारचे नाव लावले. ही भूमिहीन शेतकरी गत 35 पेक्षा अधिक वर्षांपासून जमींन कसून उदरनिर्वाह करीत आहे. या कालावधीमध्ये वनविभागाने अतिक्रमण केले म्हणून दंड देखील केलेला आहे.

Advertisement

भूमिहीन असल्याने जमीन कसण्यासाठी कायम स्वरूपी आमच्या नावावर व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी शासनाशी वारंवार पत्र व्यवहार केला आहे, परंतू शासनाने दखल न घेता, ती कंपनीसाठी हिसकावण्याचा प्रकार करीत आहे. भुमिहीन व कसत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. यावे. यावेळी राजू देसले, देविदास भोपळे, हनुमान शिंदे, सचिन खैरनार,ताराबाई बोरसे, मधुकर बरफ, योगेश जाधव, सुभाष निकम यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.



Source link

Advertisement