राजकीय: द केरला स्टोरीवर छूपी बंदी घालू नका?, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार


मुंबईएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

द केरला स्टोरी या चित्रपटावर न्यायालयाने अथवा कोणत्याही यंत्रणेने बंदी घातली नसताना तमिळनाडूमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जात नाही, तेथील प्रेक्षकांवर असा अन्याय का? अशी छूपी बंदी घालू नका, असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी केले वांद्रे पश्चिम येथे आज आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी “द केरला स्टोरीचा” खास शो आयोजित केला होता.

Advertisement

यावेळी चित्रपट निर्माते विपुल अमृतलाल शाह, सह निर्माते आशिन ए. शाह, लेखक, दिग्दर्शक सुदीप्तो सेन, अभिनेत्री अदा शर्मा, अभिनेत्री,योगिता बिहाणी, अभिनेत्री सोनिया बालानी हे यावेळी उपस्थितीत होते. यावेळी आमदार अ‍ॅड आशिष शेलार म्हणाले की, आपल्या देशात अनेक मुलींवर जो अन्याय झाला त्याचा “आवाज” हा सिनेमा झाला आहे. हा आतंकवाद बाँम्ब, गोळीचा आवाज न येणारा आतंकवाद आहे. त्याची जाणीव या सिनेमातून होते आहे. काही ठिकाणी विशेषतः तमिळनाडू सारख्या राज्यात यावर तिथल्या थिअटर असोसिएशने बंदी घातली आहे.

या सिनेमावर कोणत्याही न्यायालयाने अथवा यंत्रणेने बंदी घातलेली नसताना अशी छूपी बंदी घालण्यात येते आहे. हा तिथल्या दर्शकांवर अन्याय आहे. मुंबईत सुध्दा दाक्षिणात्य सिनेमा लागतात मग मुंबई अशी बंदी घातली जाऊ शकते का? असा सवालही या निमित्ताने उपस्थितीत होतो. त्यामुळे सर्व सिनेमा सर्वत्र लागायला हवे, त्यामुळे ज्या राज्यात केरला स्टोरीवर छूपी बंदी आहे ती उठवण्यात यावी, असे आवाहन यावेळी आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केले.

Advertisement



Source link

Advertisement