मुंबई37 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
उद्योगपती गौतम अदानी यांच्या हजारो कोटी रुपयांचा महाघोटाळा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले संबंध काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उघड केल्यानेच पोलिसांना पुढे करत राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
दरम्यान राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही. अदानी मोदींच्या महा घोटाळ्याविरोधात राहुल गांधींसह आम्ही आवाज उठवत राहू, असेही पटोले यांनी म्हटले आहे. अदानी समूहाच्या महाघोटाळ्यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेची लाखो कोटी रुपयांची स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसीमधील गुंतवणूक धोक्यात आली आहे.
नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधींनी अदानी समूहाच्या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, सरकार चौकशी करायचे सोडून 45 दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेतील वक्तव्यावर नोटीस पाठवून चौकशीसाठी पोलिस घरी पाठवणे ही केवळ हुकुमशाही आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
संबंधित वृत्त वाचा
दिल्ली पोलीस पोहोचले राहुल गांधींच्या घरी:बलात्कार पीडितांच्या वक्तव्यावर जाब विचारला, राहुल म्हणाले- थोडा वेळ द्या, मी माहिती देईन
दिल्ली पोलिस रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी (कायदा आणि सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितले की, भारत जोडो यात्रेदरम्यान केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी यांची चौकशी करायची आहे. राहुल यांनी 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये बलात्कार पीडितेची भेट घेतल्याचे सांगितले होते. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला त्यांच्याबद्दल राहुल यांच्याकडून माहिती घ्यायची आहे. वाचा सविस्तर