राजकारण: भाजपला जागा, सत्तेपेक्षा जनतेचे हित महत्त्वाचे; सुधीर मुनगंटीवार यांची जागा वाटपावरुन प्रतिक्रिया


मुंबई10 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जेव्हा बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेतृत्व करत होते तेव्हा ही, आणि आता जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेतृत्व करत आहे. तेव्हाही त्यांच्या मागन्यांचा सन्मान हा भारतीय जनता पार्टी करणारच आहे. शिंदेंना 22 जागा देण्यास किंवा लोकसभा, विधानसभेच्या जागावाटपावर भाजपचे कुणी नकार दिला नाहीये असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, भाजपने लोकसभेच्या शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला 22 जागा नाकारल्या हे मत कोणत्या नेत्यांनी व्यक्त केले नाही. कोणताही प्रश्न टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सोडवला जाणार नाही. तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चा करुन सोडवतील. आम्हाला खूर्ची, जागा किंवा सत्ता नाही तर जनतेचे हित महत्त्वाचे आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या वाटपावर भाजपने काहीच प्रतिक्रिया अजूनपर्यंत दिली नाही. आम्ही एकत्रित येऊन सर्व विचार करतो आहे.

‘सामना’तून केवळ टीका

Advertisement

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सामना अग्रलेखात कधी कौतुक केले असे कधी दाखवता येईल का? असा सवाल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. तर सामनाच्या ते कामच आहे. जे दृष्ट विचार सरणीचे असतात त्यांनी तसे काम करावे आणि जे चांगल्या विचारसरणीचे असतात त्यांनी चांगले काम करायचे असते, असे म्हणत सामना अग्रलेखात चांगला विचार येईल का? विषारी विचार करणाऱ्यांनी विषारी विचार छापायचे असतात. सामनातून अजित पवारांवरही टीका केली जाते. त्यांना स्वत:चा परिवार सोडून जग आहे हेच माहिती नाही.

मंत्रिमंडळ विस्तार जूनमध्ये व्हावा

Advertisement

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे. जूनमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, अशी आमच्यासारख्या नेत्यांची ईच्छा आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे बसून यावर चर्चा करतील. तर किर्तीकरांच नाराजी घालविण्यासाठी प्रयत्न ज्येष्ठ नेते करतील.



Source link

Advertisement