राजकारण: नरखेड बाजार समितीत अनिल देशमुख गटाचाच सभापती, पुतण्या आशिष देशमुखने आणला होता अविश्वास


नागपूर4 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नरखेड बाजार समितीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गटाच्या सभापतीविरोधात आशीष देशमुख यांच्या गटाने अविश्वास प्रस्ताव आणला होता. शुक्रवारी यासाठी पार पडलेल्या मतदानात अनिल देशमुख यांच्या गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे नरखेड बाजार समितीत अनिल देशमुख यांचाच सभापती राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Advertisement

यानंतर अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आशीष देशमुख, भाजपा आणि शिवसेनेने बाजार समितीच्या सभापतीवर अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. पण, त्यांना आवश्यक असलेली १२ मते मिळू शकली नाहीत. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत आमचा मोठा विजय झाला आहे. निवडणूक होण्यापूर्वी काही नेते मोठे-मोठे दावे करत होते, मात्र आज ते तोंडघशी पडल्याचे देशमुख यांनी सांगितले.

बाजार समितीच्या निवडणुकीत ठाकरे गटातील सदस्य विरोधात गेल्याचे पाहायला मिळाले. याबद्दल विचारल्यावर देशमुखांनी महाविकास आघाडीत आम्ही ठाकरे गटाबरोबर एकत्र आहे. ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी निरोप दिल्यानंतर सुद्धा राजू हरणे यांनी ऐकले नाही असे सांगितले.

Advertisement

हरणे यांनी भाजपबरोबर आघाडी केली. तरीही त्यांचा पराभव झाला असे ते म्हणाले. आशीष देशमुख काटोल मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारल्यावर अनिल देशमुखांनी खिल्ली उडवली. “आशीष देशमुख हे आंतरराष्ट्रीय नेते आहेत. त्यांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही’, अशी खिल्ली देशमुखांनी उडवली.Source link

Advertisement