राजकारण: ठाकरे गट अन् संभाजी ब्रिगेड राज्यात एकत्र मेळावे घेणार; जातीय – धार्मिक वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करणार


पुणे16 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शिवसेना (ठाकरे गट) आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातील समन्वय समितीची बैठक मुंबईतील माताेश्री येथे पार पडली आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झालेली असून यात प्रामुख्याने मुंबईसह राज्यभरात शिवसेना (ठाकरे गट) व संभाजी ब्रिगेड यांचे संयुक्त मेळावे लवकरच सुरु करण्यावर एकमत झाले आहे.

Advertisement

तसेच जाती व धार्मिक वाद मिटविण्यासाठी संभाजी ब्रिगेड राज्यात प्रबाेधन करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संताेष शिंदे यांनी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या साेबत बैठकीत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड.मनाेज आखरे, महासचिव साैरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित हाेते.

Advertisement

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप, आरएसएस जातीय व धार्मिक दंगली घडून आणण्याचा राज्यात प्रयत्न करत आहे. त्या थांबविण्याचे काम संभाजी ब्रिगेडच करु शकते. यापूर्वीही अनेकदा ते काम संभाजी ब्रिगेडने चांगल्याप्रकारे केले असून लाेकांचा तुमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आताही तुम्ही त्यासाठी पुढाकार घ्यावा अशी आमची इच्छा आहे. दाेन्ही संघटनाची एकत्रित भूमिका घेऊन लाेकांपर्यंत जावे. दाेन्ही संघटनात समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात येईल.

संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनाेज आखरे यांनी राज्यात संभाजी ब्रिगेड व शिवसेना (ठाकरे गट) यांनी एकत्रित निवडणुका लढविण्याबाबत चर्चा केली. देशाचे संविधान वाचविण्यासाठी व लाेकशाही टिकवण्यासाठी समविचारी पक्ष, संस्थांनी एकत्रित येण्याची गरज आहे. त्यादृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही एकत्रितपणे लढण्याचा प्रयत्न करणार आहे. नुकतेच संभाजी ब्रिगेडने राज्यसरकारकडे मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज विद्यापीठ नाव देऊन छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान करावा असे निवेदन दिलेले आहे.

Advertisement



Source link

Advertisement