राजकारण: चुकीचा निर्णय घेतला असता तर मंत्रिपदासह आमदारकीही गेली असती- मंत्री गुलाबराव पाटील


जळगाव15 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

हिंदुत्वासाठी आम्ही सट्टा खेळलो.लोकांना कांॅग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणे पसंत नसलेले काम योग्य करुन भाजपसोबत पुन्हा युती केली. हा आकडा जमला नसता तर मंत्रीपदही गेले असते.आमदारकीही वाचली नसती. जर मी चुकीचा निर्णय घेतला असता तर आज मतदार संघात जी कामे होताहेत ती झाली नसती, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

Advertisement

जळगाव ग्रामीण मतदार संघातील साळवे गावात आयोजित सभेत मंत्री पाटील बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, लोकांनी आम्हाला गद्दार म्हटले. मी तर तेहतीसव्या क्रमांकावर गेलो हाेतो. जिल्ह्यात शिवसेनेचे पाच आमदार होते. पाचमधील चार माझ्यापूर्वीच शिंदेंसोबत गेले होते. नागपूर, बुलडाण्याचेही आमदार गेले होते. नागपूर ते मुंबई मी एकटाच राहिलो होतो. काय केलं असतं मी ? एवढे कामे झाले असते का? चारही आमदार गेले तर मी एकटाच का राहू असा विचार केला. मीही गेलो. नंतर माझ्यावर टीका सुरु झाली.

जर मी चुकीचा निर्णय घेतला असता तर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मतदार संघात आता जी कामे होत आहेत. ती कामे झाली नसती. मी मुळ ट्रॅकवर आलो. जे माझ्यावर टीका करतात, त्यांना माझे आव्हान आहे. हे मंत्रीपद सहज मिळाले नाही. पंधरा ते वीस वेळेस तुुरुंगात गेलो. पूर्ण आयुष्य विरोधात गेले. सत्तेची लालसा केली नाही.

Advertisement

हा आकडा जमला नसता तर मंत्रीपदही गेले असते. आमदारकीही गेली असती. हिंदुत्वाकरीता सट्टा खेळलो. भगव्या झेंड्याला वाचवण्यासाठी भाजपसोबत गेलो. हे आम्ही पाप केलं असेल तर लोकांनी पाप म्हणावे. दुसऱ्या पक्षात गेलो नाही. आजही शिवसेना आमचा पक्ष आहे. आम्ही कांॅग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलो नाही. ते लोकांना पसंत नव्हते. ते पसंत नसलेले काम योग्य करुन पुन्हा युती केली. जळगाव ग्रामीण मतदार संघात बाराशे कोटी रुपयांची कामे मंजूर केली असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.



Source link

Advertisement