राजकारणाच्या मैदान गाजवणारे खेळाडू मात्र क्रिकेटचे खास करून आयपीएल गाजवू शकले नाही

राजकारणाच्या मैदान गाजवणारे खेळाडू मात्र क्रिकेटचे खास करून आयपीएल गाजवू शकले नाही
राजकारणाच्या मैदान गाजवणारे खेळाडू मात्र क्रिकेटचे खास करून आयपीएल गाजवू शकले नाही

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला याचा आज ४१वा वाढदिवस आहे. बंगालमध्ये जन्मलेल्या लक्ष्मी शुक्लाला क्रिकेटमध्ये खूप कमी जण ओळखतात. त्याने क्रिकेटपटूपासून ते राजकारणी नेत्यापर्यंत अशी आपली चांगली कारकिर्द घडवली आहे. तर, लक्ष्मी रतन शुक्लाच्या वाढदिवसानिमित्त एक नजर टाकूया त्याच्या कारकिर्दीवरती.

मार्च १९९९मध्ये नागपूर येथील श्रीलंकाविरुद्धच्या वनडे सामन्यातून शुक्लाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वयाच्या १८व्या वर्षी भारताकडून क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले खरे, पण त्याला जास्त काळ क्रिकेट खेळण्याची संधी मात्र मिळाली नाही. शुक्लाने भारताकडून फक्त ३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ९.००च्या सरासरीने फक्त १८ धावा केल्या आणि १ विकेट घेतली होत्या.

Advertisement

सप्टेंबर १९९९मध्ये शुक्लाने वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला होता. दुर्देवाने त्यानंतर त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली नाही. जरी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नसली तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बरेच कारनामे केले आहेत. साल १९९७-९८ला शुक्लाने बंगाल संघाकडून प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. २०१२च्या विजय हजारे ट्रॉफीतील सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील विजयी संघाचा शुक्ला भाग होता. त्याच्या पुढील वर्षात म्हणजे २०१३मध्ये शुक्लाला बंगालचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.

शुक्लाने आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेविल्स आणि सनराइजर्स हैद्राबाद संघाकडूनही क्रिकेट खेळले आहे. २००८ ते २०१४ या दरम्यान शुक्लाने आयपीएलमध्ये ४७ सामन्यात ४०५ धावा आणि १५ विकेट्स घेतल्या होत्या. अखेर, २०१५मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती घेतली. पण, इथेच तो थांबला नाही.

Advertisement

सर्वसाधारणपणे क्रिकेटपटू हे निवृत्तीनंतर प्रशिक्षण किंवा समालोचन क्षेत्राकडे वळतात. परंतु, शुक्लाने राजकारण क्षेत्राकडे धाव घेतली. २०१६मध्ये त्याने ममता बॅनर्जींच्या तृणमूल क्राँगेस पक्षामध्ये सदस्यत्व मिळवले. पुढे, उत्तर हावडामधून त्याने विधानसभा निवडणूक निवडली आणि भाजपाच्या रुपा गांगुलीला पराभूत करत विजय मिळवला. ममता बॅनर्जी सरकारने शुक्लाला आपल्या मंत्रिमंडळच्या क्रिडा आणि युवा मंत्रालयाची जबाबदारी सोपवली. जरी, शुक्ला क्रिकेट मैदानावर आपली छाप पाडू शकला नसला तरी त्याने राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र यावर्षाच्या सुरुवातीला त्याने राजकारणही सोडले. तसेच तो क्रिकेट समालोचनाकडे वळाला.

Advertisement