राखी सावंतच्या रोमँटिक सीनवरून भडकला आदिल, मारामारीपर्यंत गेलं प्रकरण


मुंबई :राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांची लव्हस्टोरी तर जगजाहीर आहे. त्याचे रोज नवे किस्से समोर येत असतात. राखी आणि आदिलचा मिळून एक म्युझिक अल्बमही रिलीज झाला आहे. त्यावेळच्या शूटिंगचा किस्सा राखीनं सांगितला.

आदिल आहे पझेसिव्ह
राखीच्या आयुष्यात आदिल आल्यावर तिचं आयुष्यच बदललं आहे. राखीनं काय ड्रेस घालायचा हे आदिलच ठरवतो. तिनं तोकडे कपडे घालू नये, असं त्याचं म्हणणं आहे. राखीकडे कोणीही वाकड्या नजरेनं पाहू नये, याची काळजी तो घेतो. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राखीनं म्युझिक अल्बमच्या गाण्याच्या शूटिंगचा प्रसंग सांगितला.

Advertisement

कार्तिक आर्यन आणि सारा अली खान पुन्हा एकत्र, दोघांमधील केमेस्ट्री पाहून चाहते फिदा

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राखी म्हणाली, ‘तू मेरे दिल मे रहने लायक नही या गाण्याचं शूट सुरू होतं. राखी आणि गाण्यातला व्हिलन यांचा रोमँटिक सीन होता. आदिलला याची अजिबात कल्पना नव्हती. या सीनमध्ये राखी आणि व्हिलनचा रोमान्स पाहून हिरो दु:खी होतो आणि निघून जातो, असं आहे. ठरल्याप्रमाणे सीन सुरू झाला.’

Advertisement

सीन पाहून आदिल संतापला
राखी सांगते, ‘शूटिंग सुरू झालं. माझा आणि व्हिलनचा रोमान्स सुरू झाला. आदिल तिथेच होता. त्याला हे पाहून धक्का बसला आणि रागही आला. त्यानं लगेच पुढे येऊन व्हिलनशी मारामारी सुरू केली. त्यावेळी राज सरांनी आदिलला शांत केलं.’

Advertisement

सलमानच्या कार वेगचा किती? पळून जाऊ लागला तर? आखलेला हत्येचा प्लॅन

‘तू मेरे दिल मे रहने लायक नही’ हे गाणं रिलीजही झालं. त्यात राखी आणि आदिलची केमिस्ट्री चांगलीच रंगली आहे. आदिल अभिनय करू शकतो, हेही अनेकांना कळलं. या व्हिडिओला ८ मिलियन्सहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

AdvertisementSource link

Advertisement