मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
विदूषकांची टोळी राज्यात फिरतेय यात पहिले नाव आहे संजय राऊत, दुसरे आहे भास्कर जाधव आणि तिसरा या दोघांचा मास्टर विदूषक उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेंकडे दुसरे काम उरले नाही म्हणून ते करमणूक करत आहेत. पण ते काम देखील त्यांना नीट जमत नाही, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली.
ठाकरेंचा पुरुषार्थ काय तर कोविड घोटाळा
आमच्या नेत्यांच्या नादी लागू नका. तुम्ही आमच्या नेत्यांवर बोलाल पण यापेक्षा कडक उत्तर देऊ असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांना गोध्रा दिसते. उद्धव ठाकरे हिंदू विरोधी झाले आता श्रीरामाबद्दल देखील ते बोलत आहेत, असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला. 370 कलम हटवून दाखवलं हा पुरुषार्थ आहे. पण उद्धव ठाकरे यांचा पुरुषार्थ काय तर कोविड काळात भ्रष्टाचार, पत्राचाळ घोटाळा, यात आहे असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
फडणवीसांवर ठाकरेंची टीका
काल जळगावमध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत गंभीर आरोप केले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात चार ते पाच वेळा टरबुज्या असा शब्द वापरला. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जप्रकरणी ठाकरे यांनी ‘जालियनवाला बाग’ हत्याकांडाप्रमाणे कोणी तरी ‘जालनावाला कांड’ करु पाहतंय, सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे. असं म्हटलं. यावेळी गर्दीतून जोरजोरात ओरडा सुरु झाला. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी टरबुज्या असा उल्लेख केला. टरबुज्यासारखा माणून मी पाहिलेला नाही. पण तुम्ही म्हणत असाल तर ठिक आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी भाजपवर तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
आज भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर
ठाकरेंच्या या टीकेनंतर आज भाजपाकडून चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना थेट विदुषकाची उपमा देत घणाघात केला. वाघ म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांना आपण करमणूकीपुरते राहिलो असे वाटलं पाहिजे म्हणून जोकरचा ड्रेस पाठवत आहोत. पत्रकार परिषदेत त्यांनी एक विदूषक देखील आणला होता. पत्रकार परिषदेत हा जोकर मागे फिरत होता. स्वतःच्या सडलेल्या बुद्धीचा भोपळा बाहेर आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ना घर का ना घाट का? अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली आहे, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.
आमच्या नेत्यांवर वर्णभेदावरुन टीका
चित्रा वाघ म्हणाल्या की, आमचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरची बावनकुळे यांच्यावर वर्णभेदावरुन टीका केली जाते. यावरून ठाकरेंसह त्यांच्या साथीदारांची मानसिकता किती घाणीरडी आहे, हे दिसून येते, असा घणाघात वाघ यांनी केला.
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला
चित्रा वाघ म्हणाल्या की, उद्धव ठाकरे साहेब यांनी स्वतःच आपले घर फोडले आहे. त्यांना आता जेलमध्ये जाऊन चक्की पिसून आलेल्या व्यक्तीसोबत म्हणजेच संजय राऊत यांच्यासोबत राहावे लागत आहे. त्यामुळे
ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला, अशी परिस्थिती येथे पाहायला मिळत आहे, तशी अवस्था ठाकरेंची झाली आहे, अशा शब्दात वाघ यांनी ठाकरेंवर घणाघात केला.
उद्धव ठाकरे गेले कित्येक दिवस भविष्य वर्तवत आहे. अमुक ठिकाणी भाजप दंगली घडवणार, तमुक वातावरण पेटणार असं भविष्य सांगतायत. पोपट घेऊन भविष्य सांगणाऱ्या भोंदूसारखी उद्धव ठाकरे यांची अवस्था झाल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीआहे.