राऊतांचा पलटवार: विरोधी पक्ष सोबत असल्यावरच मदत मिळणार असेल, तर केंद्राने तसे सांगावे- संजय राऊत


Advertisement

मुंबई4 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • देवेंद्र फडणवीसांच्या टोल्यावर राऊतांचा पलटवार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने काल(8जून) पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश होता. त्यांच्या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला. त्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे. ‘विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसे केंद्राने जाहीर करावे’, असे संजय राऊत म्हणाले.

Advertisement

राऊत यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, राज्याला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री काल दिल्लीत गेले होते. त्या भेटीकडे सकारात्मकदृष्टीने पाहायला हवे. विरोधी पक्षाने त्या भेटीचे स्वागत करायला हवे. आम्हाला या भेटीसाठी नेले असते तर बरे झाले असते, असे विरोधक म्हणत आहे. विरोधी पक्षाला नेण्याने जर राज्याला मदत मिळत असेल तर तसे केंद्राने जाहीर करावे, असा टोला राऊत यांनी लगावला.

…तर भाजपचे स्वागत
राऊत पुढे म्हणाले की, केंद्रात भाजपचे सरकार आहे. काही गोष्टी केंद्राकडे न्याव्या लागतात. केंद्राला राज्याच्या अडचणी सांगाव्या लागतात. विरोधी पक्षनेते जाणकार आहेत. याबाबत विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांना सल्ला आणि सूचना द्यायला हव्यात. शिवाय, राज्याच्या प्रश्नांवर भाजप चिंतन करत असेल तर त्यांच्या बैठकीचे स्वागत आहे, असेही ते म्हणाले.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here