रहाणे-पुजाराप्रमाणे कोहलीही खराब फॉर्ममध्ये तरी त्याच्यावर प्रश्न उपस्थित होत नाहीत: आशिष नेहरा


Advertisement

जोहान्सबर्ग : भारतीय कसोटी क्रिकेट संघातील (Team India) अनुभवी खेळाडू खराब फॉर्ममध्ये असल्याने संघाला मोठा तोटा होत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातही अनुभवी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) शून्यावर तर चेतेश्वर पुजारा (Cheteswar Pujara) 3 धावा करुन बाद झाला. ज्यामुळे अनेकजण त्यांच्याबाबत प्रश्न उपस्थित करत असून आशिष नेहराने मात्र त्यांची पाठराखण करताना, ‘रहाणे, पुजाराप्रमाणे कोहलीही खराब फॉर्ममध्ये आहे, पण त्याच्यावर प्रश्न उपस्थित होत नाहीत, त्यामुळे रहाणे पुजारावरही विश्वास ठेवायला हवं’ असं नेहराचं मत आहे.

मागील काही सामने पुजारा आणि रहाणे खराब फॉर्ममध्ये आहेत. पण टीम मॅनेजमेंट त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना अंतिम 11 मध्ये स्थान देत आहेत. पण आता दक्षिण आफ्रीकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात पुजारा 33 चेंडूत 3 आणि रहाणे शून्य धावा करुन बाद झाला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मते या दोघांनाही बऱ्याच संधी मिळाल्या असून त्यांच्या जागी दुसऱ्या खेळाडूंना संधी द्यायला हवी. अशी मागणी होत आहे. दरम्यान यावर बोलताना भारताचा माजी गोलंदाज आशिष नेहराच्या मते अलीकडे कोहलीचे आकडेही रहाणे आणि पुजाराप्रमाणे खास नाहीत. पण त्याच्यावर विश्वास ठेवला जात आहे. अर्थात त्यांची एकमेकांशी तुलना होणार नसेल तरी कोहली जितका भारी खेळाडू आहे. तसेच पुजारा आणि रहाणेही फॉर्ममध्ये असताना अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. असं नेहरा म्हटला आहे. 

Advertisement

‘रहाणेला संधी मिळायला हवी’

नेहरा पुढे बोलताना म्हणाला, पहिल्या कसोटीत जर रहाणेला संघात घेतलं आहे, तर संपूर्ण मालिकेत त्यांना संधी मिळायलात हवी. भारताचा दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक कसोटी जिंकण्याची संधी असून यामध्ये रहाणे आणि पुजारा यांची महत्त्वाची खेळी ठरु शकते. त्यामुळे केपटाउनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतही दोघांना संधी मिळायला हवी असं मत नेहराने नोंदवलं आहे. 

Advertisement

हे ही वाचा –

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

AdvertisementSource link

Advertisement