रस्ता सुरक्षेतील उत्कृष्ठ कार्य: जॅकी श्रॉफ, अप्पर पोलिस महासंचालक कुलवंत सरंगल यांच्या हस्ते ‘नाशिक फर्स्ट’ चा गौरव


नाशिकएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नाशिक फर्स्टच्या ट्रॅफिक एज्युकेशन पार्क २०१५ पासुन सातत्याने रस्ता सुरक्षा प्रशिक्षण घेत आहे. याची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली. रस्ता सुरक्षेतील उल्लेखनिय कामगिरीबद्द हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते व राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (वाहतुक) कुलवंत सरंगल , परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, राज्य रस्ते विकास महामंडळाचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर संजय यादव यांच्या प्रमुख़ उपस्थितीत प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

Advertisement

नाशिक फर्स्टच्या वतीने संचालक सुरेश पटेल व व्यवस्थापक भिमाशंकर धुमाळ यांनी प्रशस्तीपत्रक स्विकारले. या कार्यक्रमात नाशिक फर्स्टने आतापर्यंत रस्ता सुरक्षा विषयक केलेल्या विविध कार्याची चित्रफित दाखविण्यात आली त्यास उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून नाशिक फर्स्ट च्या कार्याला दाद दिली.

सुरक्षित वाहतुकीचे महत्व या विषयावर जनजागृती करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने ११ ते १७ जानेवारी २०२३ पर्यंत रस्ते सुरक्षा साप्ताह पाळत आहे. राज्यात या अभियानाचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (एनपीए) सेंटर नरिमन पॉईंट मुंबई येथे झाले.

Advertisement

यावेळी देसाई म्हणाले, वाहतुकीचे नियम पाळणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.नाशिक फर्स्ट सारख्या समाजसेवी संस्थांच्या रस्ता सुरक्षा कार्याच्या व्हिडीओ क्लीप लावाव्यात. अशा कार्यासाठी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेतले पाहिजे.

आपणच चालकाला विश्रांती न देता सलग ड्रायव्हिंग करायला लावतो आणि यामुळे असे अपघात होतात. याची आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जर अपघात होत असतील तर त्याला जबाबदारही शासन आहे. त्यावर आम्ही तातडीने उपाययोजना करु.

Advertisement

यावेळी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते रस्ते वाहतुक सुरक्षा या विषयात विशेष व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. मुंबई मध्यचे आरटीओ तथा महाराष्ट्र राज्याचे परिवहन उपायुक्त (वाहतुक सुरक्षा) भरत कळसकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement