इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ३५वा सामना शनिवारी गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे पार पडलेल्या या सामन्यात गुजरात संघाने शेवटच्या षटकात रोमांचक विजय मिळवला. त्यांनी ८ धावांनी सामना खिशात घातला. या विजयाचा शिल्पकार हार्दिक पंड्या ठरला.
या सामन्यात गुजरात संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. गुजरातने यावेळी निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १५६ धावा केल्या होत्या. हे आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघाला ८ विकेट्स गमावत १४८ धावाच करता आल्या. त्यामुळे कोलकाताला हंगामातील सलग चौथा सामना गमवावा लागला. कोलकाता नाईट रायडर्सनेची पडझड होत असताना रिंकू सिंहने व्यंकटेश अय्यर सोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र यश दयालने रिंकू सिंहला ३५ धावांवर बाद केले. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा निम्मा संघ ७९ धावात माघारी गेला. संघाची अवस्था ३ बाद १६ अशी झाली असताना कर्णधार श्रेयस अय्यरकडून डाव सावरण्याची अपेक्षा होती. मात्र यश दयालने त्याला १२ धावांवर बाद करत केकेआरला चौथा आणि मोठा धक्का दिला.
आयपीएलच्या ३५ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गुजारात टायटन्सला १५६ धावात रोखले. केकेआरचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने गोलंदाजीत दमदार कामगिरी करत गुजरातच्या फलंदाजीला एकाच षटकात सुरूंग लावला. त्याने एका षटकात ५ धावा देत ४ विकेट घेतल्या. यामुळे गुजरातची अवस्था ५ बाद १५१ धावांवरून ९ बाद १५६ अशी केली. सलामीवीर शुबमन गिल ( ७) टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर वृद्धीमान सहा (२५) व हार्दिक यांनी डाव सावरण्याच्या प्रयत्न करताना ७५ धावांची भागीदारी केली. डेव्हिड मिलर ( २७) व हार्दिक यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ५० धावांची भागीदारी केली. टीम साऊदीने १८व्या षटकात हार्दिकला बाद केले. हार्दिकने ४९ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ६७ धावा केल्या. त्याच षटकात राशिद खान (०) बाद झाला. साऊदीने २४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. २०व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर आंद्रे रसेलने सलग दोन विकेट्स घेतल्या.