रसेलच्या शो-मुळे कोलकाता सनराईजर्स हैदराबादला सोबत घरी गेली घेऊन; कदाचित बाहेर…

रसेलच्या शो-मुळे कोलकाता सनराईजर्स हैदराबादला सोबत घरी गेली घेऊन; कदाचित बाहेर...
रसेलच्या शो-मुळे कोलकाता सनराईजर्स हैदराबादला सोबत घरी गेली घेऊन; कदाचित बाहेर...

‘द आंद्रे रसेल शो’; कोलकाता नाईट रायडर्सने सनराईजर्स हैदराबादचा ५४ धावांनी पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सचे १७८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या सनराईजर्स हैदराबादने सावध सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मात्र १७ चेंडूत ९ धावांची खेळी करणारा केन विल्यमसन आंद्रे रसेलच्या चेंडूवर बोल्ड झाला. पॉवर प्लेमध्ये १ बाद ३१ धावा करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, साऊदीने राहुल त्रिपाठीला ९ धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला.

दरम्यान, सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत संघाला अर्धशतक पार करून दिले. तो आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला असताना वरूण चक्रवर्तीने त्याला ४३ धावावर बाद केले. पाठोपाठ सुनिल नारायणने देखील निकोलस पूरनला २ धावांवर माघारी धाडत हैदराबादला चौथा धक्का दिला. एका मागोमाग एक हैदराबादचे फलंदाज बाद होत असताना एडिन माक्ररमने एक बाजू लावून धरली होती. मात्र उमेश यादवने ३२ धावांवर त्याचाही त्रिफळा उडवला. त्यामुळे केकेआरची अवस्था ५ बाद ९९ अशी झाली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरची सुरूवात खराब झाली. मार्को जेनसेनने श्रेयस अय्यरचा ७ धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि नितीश राणा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र उमरान मलिकने केकेआरच्या डावाला सुरूंग लावण्यास सुरूवात केली. त्याने पहिल्यांदा नितीश राणाला २६ धावांवर त्यानंतर अजिंक्य रहाणेला २८ धावांवर बाद करत केकेआरला दोन मोठे धक्के दिले. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि सॅम बिलिंग्ज यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र उमरानने पुन्हा एकदा मोठा धक्का देत कर्णधार श्रेयस अय्यरला १५ धावांवर बाद केले.

यांनतर नटराजनने रिंकू सिंहला ५ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत केकेआरची अवस्था ५ बाद ९४ अशी केली. अखेर बिलिंग्ज आणि आंद्रे रसेलने भागीदारी रचत संघाला १५० च्या पार पोहचवले. ज्यावेळी धावांची गती वाढवायची होती त्यावेळी भुवनेश्वरने बिलिंग्जला ३४ धावांवर बाद केले. यामुळे सर्व जबाबदारी रसेलवर आली. रसेलने वॉशिंग्टन सुंदर टाकत असलेल्या शेवटच्या षटकात तुफान फटकेबाजी करत तीन षटकार ठोकले. रसेलने २८ चेंडूत नाबाद ४९ धावांची खेळी करत केकेरआला १७७ धावांपर्यंत पोहचवले.

Advertisement