पुणे38 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
माजी आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना फोन टॅपिंगमध्ये ज्याप्रकारे कारवाईस सामोरे जावे लागले तशी कारवाई रश्मी शुक्ला यांच्यावर का झाली नाही. परमवीर सिंग यांच्या ऐकीव माहितीवर ते उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करतात. ते अभ्यासू नेते आहे की नाही माहिती नाही परंतु कपटी राजकारणी आहे.
मुंबई महापालिका ताब्यात घेण्याची वल्गना ते मालका सारखी करतात. आम्ही मुंबई मनपा मालका सारखी नाही, तर पालका सारखी जपली म्हणून मागील 25 वर्ष आम्ही मुंबई मनपामध्ये सत्ता राखून असल्याचे मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी शिवसेना पुणे शहर अध्यक्ष गजानन थरकुडे, संजय मोरे ,बाळा ओसवाल उपस्थित होते.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये येऊन मनपा निवडणूक याचा नारळ फोडला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन अनेक आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर केले आहे. एखाद्या माणसाने पाप केले किंवा गुन्हा केला तर त्याला कारागृहात टाकले जाते. अशी भीती फडणवीस यांना वाटते आहे का..मुख्यमंत्री यांचे अधिकार किती असतात हे उपमुख्यमंत्री असून मुख्यमंत्री यांचे अधिकार वापरणाऱ्या फडणवीस यांना माहिती आहे.
फडणवीस यांनी उत्तर द्यावे
शिवसेना ओपन किचन असून कोणते डावपेच आम्ही करत नाही. सत्ता असताना सर्व केंद्रीय सत्ता हाताशी धरून राज्यातील विरोधी नेत्यांना कोणी आत टाकले आहे याचे उत्तर फडणवीस यांनी द्यावे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 130 धाडी तपास यंत्रणांकडून टाकण्यात आल्या. खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर ती बेकायदेशीर असल्याचे उच्च न्यायलयाने फटकारले आहे. प्रताप सरनाईक यांना कोणी छापे टाकत भीती घालून भाजपने मेटाकुटीस आणले. अशाचप्रकारे यशवंत जाधव, राजन साळवी, अर्जुन खोतकर यांना तपास यंत्रणांनी त्रास दिला.
सोमय्या मोठे की कोर्ट
देशात नेमकी मोठी यंत्रणा कोणती मानायची सुप्रीम कोर्ट की किरीट सोमय्या. सोमय्या न्यायलयाचे निर्णय न मानता आरोप करतात. सुडाचे राजकारण करण्यात फडणवीस महिर असून त्याची कबुली त्यांनी दिली आहे. ज्यावेळी पाहिजे त्यावेळी कोणाला ही ते अडचणीत आणतात आणि गरज असेल तेव्हा जवळ करतात. 15 लोकांना तपास यंत्रणा क्लीन चीट दिली असून स्वतःलाही क्लीन चिट फडणवीस यांनी दिली. आदित्य ठाकरे यांना कारागृहात टाकण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न करण्यात आले याचे उत्तर द्यावे. फडणवीस यांनी कोणत्या गुन्ह्याची आपल्याला भीती वाटते त्यामुळे तुमचे मन तुम्हाला खाते आहे ते जनतेस सांगावे.
मातोश्रीचे उंबरे कोण झिजवते
भाजप नेते आशिष शेलार हे ठाकरे यांना अपयशी मुख्यमंत्री म्हणतात तर मग त्यांचे शेठजी (अमित शाह) हे मातोश्रीचे उंबरे सारखे का झिजवत होते. भाजपचे लोक अभ्यास न करता सध्या केवळ आरोप करतात. मोदी शेठ किंवा शाह शेठ यांना त्यांचे प्रतिनीधी का मातोश्रीवर पाठवसे वाटत आहे. अपयशी भाजप असून भाजपकडे कोणते मुद्दे राहिलेले नाही असा टोला अंधारे यांनी लगावला आहे.
आंबेडकर यांच्याशी जुळून घेऊ
भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी मला चोर, दरोडेखोर म्हणाले नाही. ते मला ओळखत नाही चांगले यानिमित्ताने ओळख होईल. त्यांचा आणि माझा विचाराचा धागा एकच आहे त्यामुळे आम्ही एकत्रित पुढे जाऊ असे अंधारे म्हणाल्या.