रवी शास्त्रींच्या मते मुंबई इंडियन्सकडे गमावण्यासारखे काही नाही त्यामुळे त्यांनी अर्जुन तेंडूलकरचा विचार करावा

रवी शास्त्रींच्या मते मुंबई इंडियन्सकडे गमावण्यासारखे काही नाही त्यामुळे त्यांनी अर्जुन तेंडूलकरचा विचार करावा
रवी शास्त्रींच्या मते मुंबई इंडियन्सकडे गमावण्यासारखे काही नाही त्यामुळे त्यांनी अर्जुन तेंडूलकरचा विचार करावा

भारतीय संघाचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सचा भाग आहे. मागच्या हंगामात देखील अर्जुन मुंबईच्या ताफ्यात सहभागी होता, पण अद्याप त्याला या लीगमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नाहीये. असे असले, तरी आयपीएल पदार्पणासाठी अर्जुनचा ही प्रतिक्षा आता संपण्याची शक्यता आहे. असे मत रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे संघ व्यवस्थापन अर्जुनला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करू शकते.

मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ मध्ये त्यांच्या सुरुवातीच्या आठ सामन्यात लागोपाठ पराभव स्वीकारला आहे. या निराशाजनक खेळीमुळे या हंगामात त्यांची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची कसलीही शक्यता उरली नाहीये. एकंदरीत विचार केला, तर मुंबईकडे गमावण्यासाठी आता काहीच उरले नाही. याच कारणास्तव संघ व्यवस्थापन बेंचवरील खेळाडूंना आता प्लेइंग इलेव्हनमध्ये  संधी देऊ शकते. १२ वर्षीय अर्जुन तेंडुलकर देखील आता प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

शनिवारी आयपीएलच्या डबल हेडरचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा खेळला जाणार आहे. मागच्या हंगामापासून पदार्पणाची संधी शोधणाऱ्या अर्जुनला या सामन्यात ही संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागच्या वर्षी मुंबईने त्याला मूळ किंमतीत म्हणजेच २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते, पण यावर्षीच्या मेगा लिलावात अर्जुनसाठी मुंबई इंडियन्सने १० लाख अधिकचे म्हणजेच एकूण ३० लाख रुपये मोजले.

अर्जुन एक वेगवान गोलंदाज आहे. सध्या मुंबईच्या कॅम्पमध्ये तो जसप्रीत बुमराह आणि जहीर खानसारख्या दिग्गजांकडून गोलंदाजीचे धडे घेत आहे. अर्जुन गोलंदाजीसोबत संघासाठी खालच्या फळीत फलंदाजीसाठी चांगला पर्याय बनू शकतो. मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये अर्जुनला त्याचे वडील सचिनचेही मार्गदर्शन मिळत आहे. सचिन तेंडुलकर मुंबईचा मार्गदर्शक आहे. अर्जुन यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघासाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळला आहे. तसेच, महाराष्ट्रासाठी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक टी-२० लीग खेळल्या आहेत आणि यामध्ये चांगले प्रदर्शन देखील केले आहे.

Advertisement