भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन मधल्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब होता. मागच्या वर्षी टी-२० विश्वचषक संघात त्याला आश्चर्यकारकपणे संधी मिळाली आणि त्याने चांगले पुनरागमन केले. सध्या आयपीएल २०२२ मध्ये तो राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. अश्विनने आता भारतीय संघाच्या माजी प्रशिक्षकाकडून त्याला मिळालेल्या एका सल्ल्याची आठवण करून दिली आहे.
सपाट खेळपट्ट्यांवर रविचंद्रन अश्विन आपल्या संघ राजस्थान रॉयल्ससाठी अडचणीचा ठरत असल्याचे मत भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर गुजरात टायटन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२२ च्या क्वालिफायर १ सामन्यात अश्विनने सर्वोत्तम कामगिरी केली नाही. अश्विनने आपल्या पहिल्याच षटकात गुजरात टायटन्सचा फलंदाज शुभमन गिलने दोन चौकार आणि एक षटकार ठोकला. स्टार ऑफस्पिनरच्या या खराब कामगिरीबद्दल मांजरेकर यांनी त्याच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अहमदाबादमधील खेळपट्टी सपाट असल्याने अश्विन पुन्हा राजस्थानसाठी अडचणीचा ठरू शकतो, असे मांजरेकरांचे मत आहे. अश्विनने गुजरातविरुद्ध ४ षटकात ४० धावा दिल्या होत्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.
आयपीएल २०२२ मध्ये रविचंद्रन अश्विन चांगले प्रदर्शन करत आहे. यावर्षी त्याने गोलंदाजीसोबतच फलंदाजीत देखील महत्वाचे योगदान दिले आहे. राजस्थान रॉयल्सच्या युट्यूब चॅनलवर बोलताना अश्विनने त्याच्या खेळाच्या शैलीविषयी मोकळेपणाने चर्चा केली. तो म्हणाला की, “खूप वर्षांपूर्वी डंकन फ्लेचर भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. मी नेहमी त्यांना विचारायचो की, मी अधिक उत्तम कसा बनू शकतो ? मी सुधारणा करण्यासाठी काय करू? यावर त्यांचे सरळ उत्तर असायचे की, एकच मार्ग आहे, ज्यामुळे तू अजून चांगला बनू शकतो. तो मार्ग आहे चूका करणे आणि लोकांसमोर अपयशी होणे, मी हीच गोष्ट माझ्या संपूर्ण आयुष्यात करत आलो आहे.”
ESPNCricinfo शी संभाषणात मांजरेकर म्हणाले, “रविचंद्रन अश्विन फ्लॅट ट्रॅकवर आरआरसाठी एक समस्या आहे कारण तो बरेच बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रसंगी तो ऑफ-स्पिनर गोलंदाजी कमी करतो. अश्विन जेव्हा त्याच्या गोलंदाजीत एक वळण घेतो तेव्हा तो सर्वात वरचा धोकादायक गोलंदाज बनतो. तो म्हणाला की, “खूप वर्षांपूर्वी डंकन फ्लेचर भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. मी नेहमी त्यांना विचारायचो की, मी अधिक उत्तम कसा बनू शकतो ? मी सुधारणा करण्यासाठी काय करू? यावर त्यांचे सरळ उत्तर असायचे की, एकच मार्ग आहे, ज्यामुळे तू अजून चांगला बनू शकतो. तो मार्ग आहे चूका करणे आणि लोकांसमोर अपयशी होणे, मी हीच गोष्ट माझ्या संपूर्ण आयुष्यात करत आलो आहे.”
“मला याविषयी नेहमी ऐकून घ्यावे लागले आहे की, मी कशा पद्धतीने माध्या सीमा ओलांडून विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे. कधी-कधी लोकांना वाटते की मी हे सर्व काय करत आहे? मी अती महत्वाकांशी आहे का ? पण एका खेळाडू आणि माणसाच्या रूपात मी असाच आहे. जर तुम्ही माझ्यातून ही गोष्ट काढून घेतली, तर मी पूर्णपणे मोकळा होईल. मला ज्या पद्धतीचे स्वातंत्र्य आणि वातावरण पाहिजे, जर ते मिळाले, तर मी खूप काही मिळवू शकतो,” असेही अश्विन पुढे म्हणाला.