रझाकारांसह ‘सजा’कारांचाही ‘मनसे’ बंदोबस्त करेल: राज यांचा इशारा; मुक्तिसंग्रामाचा इतिहास शाळांमध्ये शिकवण्याची मागणी



मुंबईएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन असून, या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहित हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे, असे आवाहन केले आहे.

Advertisement

हैदराबाद मुक्तिसंग्राम हा काही विलिनीकरणाचा लढा नव्हता, तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता, असेही ते म्हणाले.

हैदराबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचे अखंडत्वच धोक्यात आले असते. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरे तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Advertisement

अभिमान करण्याच्या दिवस

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास शाळांमध्ये शिकवला जावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. आजचा दिवस अत्यंत गौरवाचा दिवस असून, आजच्या दिवशीच आपण मराठवाड्यासाठी लढा दिला. त्यासाठी अभिमान करण्याचा हा दिवस असल्याचेही ते म्हणाले.

Advertisement

इतिहास शाळेत शिकवा

आज हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन असून, या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी मागणी केली आहे. आता नवे शिक्षण धोरण येत आहे. या धोरणानुसार त्या-त्या राज्यातील पुसून टाकलेला इतिहास शाळेत शिकवला जाणार आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकात शिकवला गेला पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

Advertisement

राज ठाकरेंचे ट्विट

राज ठाकरे यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. तसेच, हैदराबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचे अखंडत्वच धोक्यात आले असते. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे. म्हणून खरं तर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन, हा एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.

Advertisement

का बोलले जात नसेल?

Advertisement

हैदराबाद मुक्तिसंग्रामाविषयी फारसे का बोलले जात नसेल? अर्थात रझाकारांचे लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचे सरकार कित्येक वर्ष राज्यात होते. त्यामुळे हे होणे स्वाभाविक होते. पण सध्या याच रझाकारांची पुढची औलाद मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते आणि दुर्दैव असे की माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली आहे. संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीत तर आधुनिक ‘सजा’कार पण येऊन बसलेत.

गेली कित्येक वर्ष संभाजीनगरच्या महापालिकेत खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे ‘सजा’कार. अर्थात लवकरच मनसे रझाकार आणि सजाकार या दोघांचा बंदोबस्त करेल, असा इशारा देत राज ठाकरे यांनी मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement

माहिती मिळत राहिली

मुक्तिसंग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा, अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी केली आहे. मला नेहमी वाटते की इतक्या मोठ्या लढ्याबाबत आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे. मला अनंत भालेरावांचे या विषयावरचे पुस्तक वाचून लढ्याबद्दल काही गोष्टी कळल्या. मग पुढे नरहर कुरुंदकरांची या विषयावरची काही व्याख्याने यूट्युबवर ऐकताना नवीन माहिती मिळत राहिली. पण एकूणच असे वाटते की या इतक्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसे कुणाला माहित नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

Advertisement

माझे म्हणणे आहे की, आता जे नवे शिक्षण धोरण येत आहे. त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढा हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये, असेही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement