मुंबई13 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
समीर वानखेडे यांनी दिल्ली हायकोर्टात १८ मे ला आपल्या बचावात एक रिट याचिका दाखला केली होती. यावर आज सुनावणी झाली असून समीर वानखेडेंना हायकोर्टाने तात्पूरता दिलासा दिला आहे. त्यांना २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. दरम्यान ” शाहरूख खान मुलाला सोडवा म्हणून विनवणी करीत होता” समीर वानखेडेंनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेतून हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
चॅटमध्ये पैशांचा उल्लेख नाही
कोर्टात चॅट्समध्ये आर्यन खान संदर्भात केलेल्या संभाषणाचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. त्यात काही धक्कादायक खुलासेही समोर आले आहेत. मुलाला सोडवा म्हणून शाहरूख खान विनवणी करीत होता. तसेच समीर वानखेडे आणि शाहरुख खानचे अनेकवेळा संभाषण झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, शाहरूख खानच्या चॅटमध्ये कोणतेही आमिषं नव्हती. चॅटमध्ये पैशांचा उल्लेख नव्हता.
…म्हणून चॅट कोर्टात सादर केले
जे आरोप झाले ते बिनबुडाचे आहेत, त्यामुळे कोर्टात चॅटींग सादर करण्यात आले आहे. सीबीआय समीर वानखेडेंना अटक करतील अशी आम्हाला शंका होती. या प्रकरणी सीबीआयला कोर्टात सोमवारपर्यंत उत्तर द्यायचे आहे. तर समीर वानखेडेंना २२ मे पर्यंत कोर्टाने अटकेपासून संरक्षण दिले आहे अशी माहिती वानखेडेंचे वकीलांनी माध्यमांना दिली आहे.
काय आहे याचिकेत?
समीर वानखेडे यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांसह आर्यन खान ड्रग्स प्रकरणी तपास करत आहेत. आयर्न खानला सोडवण्यासाठी तेव्हा 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप वानखेडे आणि अन्य अधिकाऱ्यांवर आहे, असा आरोप CBI तर्फे करण्यात आला आहे. यानंतर समीर वानखेडे यांनी कोर्टात रिट पीटीशन दाखल केली. त्यात ”मुलाला सोडवण्यासाठी शाहरुखने विनंती केल्याचं याचिकेत नमूद करण्यात आल्याची धक्कायक माहिती पुढे येतेय. समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खान यांचं व्हॉट्सअप चॅट कोर्टासमोर आलेले आहे.
समीर वानखेडे यांच्या याचिकेमधून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सीबीआयने नुकतेच समीर वानखेडे यांच्या घरावर देखील छापेमारी देखील केली होती. या प्रकरणात वानखेडे यांच्यावर खंडणी आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यासह ५ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये एनसीबीच्या इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याच प्रकरणात सीबीआयने २० ठिकाणी छापे टाकले आहेत, ज्यात मुंबई, रांची, कानपूर, दिल्लीचा समावेश होता.
वानखेडेंनी तपासात सहकार्य करावे – कोर्ट
समीर वानखेडेंच्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली. यात समीर वानखेडे यांनी तपासात सहकार्य करावे असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.