म्हाडाची घरे: राज्य सरकारने सामान्यांना दिलासा; भिवंडीत म्हाडा 20 हजार घरे बांधणार, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा


Advertisement

एका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

भिवंडीत म्हाडा 20 हजार घरे बांधणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. आव्हाड यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली. आव्हाड यांनी शुक्रवारी उशिरा भिवंडी महानगरपालिका मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी महापौर प्रतिभा पाटील, आयुक्त सुधाकर देशमुख यांसह अधिकारी, पदाधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली.

Advertisement

जितेंद्र आव्हाड यांनी आढावा बैठक घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील विविध शहरात म्हाडाची घरं आहेत. भिवंडी पालिका प्रशासनाने भूखंड उपलब्ध करुन दिल्यास ठाण्याच्या धरतीवर भिवंडीतही म्हाडा २० हजार घरांची उभारणी करेल, असे म्हटले होते. दरम्यान, आज आव्हाड यांनी ट्विट करत भिवंडीत २० हजार घरं बांधणार असल्याची माहिती दिली.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here