मोताळा शहरातील नागरीक मूलभूत सुविधांपासून वंचित: विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे निवेदन

मोताळा शहरातील नागरीक मूलभूत सुविधांपासून वंचित: विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीचे निवेदन


मोताळा33 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

येथील महसूल, कृषी विभाग, वीज वितरण, नगर पंचायत यासह इतर शासकीय कार्यालयात नागरिकांची कामे होत नाहीत. तसेच शहरातील नागरीक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. तर दुसरीकडे राज्यात शासनाकडून जनतेसाठी शासन आपल्या दारी उपक्रम हा प्रसिद्धीसाठी राबवल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांचा निपटारा करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज २८ ऑगस्ट रोजी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

Advertisement

राज्यात शासनाकडून जनतेसाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम प्रसिद्धीसाठी राबवल्या जात असल्याचे शासकीय कार्यालयात गेल्यावर समजते. एक दिवस जिल्ह्यात जाऊन संपूर्ण अधिकारी व कर्मचारी एकत्रीत करून शासनाच्या नावावर पक्षीय मेळाव्याचे आयोजन करून जनतेची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम सरकारचा सुरू आहे. तालुक्यातील अनेक कार्यालयात जनतेची कामे रेंगाळत पडली आहेत. ग्रामीण भागातील तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक हे गावात जात नाहीत. तहसील कार्यालयात निराधार योजना, रेशन कार्ड, शेत रस्त्याच्या तक्रारी, शाळकरी मुलांचे शालेय कागदपत्रे, कोटवार बुकाची नक्कल तसेच सेतू केंद्रात होत असलेली लूट अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच कृषी सहाय्यक व मंडळ अधिकारी हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गावात जात नाही, शेतकऱ्यांनी विद्युत जोडणीसाठी अर्ज केला असता लवकर वीज जोडणी मिळत नाही जळालेले रोहित्र लवकर मिळत नाही. मात्र वीज बिल वसुलीसाठी कर्मचारी दारोदारी फिरतात. शासन आपल्या दारीचा गवगवा न करता उपरोक्त समस्यांचा निपटारा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष डॉ. शरद काळे, तालुका कार्याध्यक्ष सुनील कोल्हे, शहर अध्यक्ष संदीप वानखेडे, सदाशिव घाटे, चंद्रकांत शिराळ, पवन पठार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Advertisement



Source link

Advertisement