मोठ्या रॅकेटचा भंडाफोड: केरळमध्ये ​​​​​​​पत्नींची अदलाबदली करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, 1000 हून अधिक जोडप्यांचा होता सहभाग, 7 आरोपींना अटक


  • Marathi News
  • National
  • 7 People Arrested For Running Wife Swapping Racket; 1000 Couples Were Associated With The Gang

Advertisement

4 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

केरळमधील कोट्टायम येथे पत्नी स्वॅपिंग रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हे रॅकेट चालवणाऱ्या सात जणांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. एका सदस्याच्या पत्नीच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पोलिसांनी सांगितले की, 7 जणांना अटक करण्यात आली असून 25 जणांवर नजर ठेवण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत आणखी अटक करण्यात येणार आहे.

Advertisement

महिलेने करुकचल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, तिच्या पतीने तिला इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. महिलेने तिच्यासोबत अनैसर्गिक सेक्स केल्याचे सांगितले. आरोपी पतीला अटक केल्यानंतर पोलिसांना एका मोठ्या नेटवर्कचा सुगावा लागला. सुमारे 1000 जोडपी या रॅकेटशी संबंधित असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून टोळी कार्यरत
अटक करण्यात आलेले हे कोट्टायम, पठानमथिट्टा आणि अलप्पुझा जिल्ह्यातील आहेत. काराकुचल पोलिसांनी सांगितले की, हे रॅकेट फेसबुक आणि टेलिग्रामसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून चालवले जात होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या रॅकेटमध्ये अनेक उच्चभ्रू लोकांचाही समावेश आहे.

Advertisement

रॅकेटमध्ये सामील असलेले जोडपे जेव्हाही भेटायचे तेव्हा त्यांच्या पत्नींची अदलाबदली करायचे. अनेकवेळा महिलांना एकाच वेळी तीन पुरुषांशी संबंध ठेवायला भाग पाडले जात होते. अनेक सिंगल तरुणांकडून इतर पुरुषांचे भागीदार शेअर करण्यासाठी पैसेही दिले.

कपन स्वॅपिंग ग्रुपमध्ये एक्सचेंज केल्या जात होत्या बायका
एका अधिकाऱ्याने सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून समविचारी लोकांची निवड करण्यात आली आणि खासगी ‘कपल स्वॅपिंग’ गटांमध्ये पत्नींची अदलाबदली करण्यात आली. या रॅकेटमधून अनेक जण फेसबुकशी जोडले गेले होते. हे रॅकेट बनावट सोशल मीडिया अकाऊंट वापरायचे, त्यामुळे त्याच्यांशी संबंधित सर्वांना पकडायला वेळ लागेल.

Advertisement

या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाशी संबंधित लोकांची सर्व माहिती काढली जात असून या गटातील लोकांचे अन्य कोणत्या गटाशी संबंध आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement