मोठी बातमी: घाटीत सुरू झाला कॅन्सरवर उपचारासाठी ब्रेस्ट क्लिनिक कक्ष; आठवड्यातून दोनदा होणार तपासणी

मोठी बातमी: घाटीत सुरू झाला कॅन्सरवर उपचारासाठी ब्रेस्ट क्लिनिक कक्ष; आठवड्यातून दोनदा होणार तपासणी


छत्रपती संभाजीनगरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे महिलांना आपले प्राण देखील गमवावे लागत आहे. कॅन्सरमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ब्रेस्ट कॅन्सरचे आढळत आहेत. त्यामुळे योग्य वेळेत तपासणी करण्याचा सल्ला डॉ. सरोजिनी जाधव यांनी दिला.

Advertisement

घाटीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ड्रेसचे उद्घाटन ब्रेस्ट क्लिनिकचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कल्याणकर, डॉ. कैलास झिने, बालरोग विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर खैरे, नवजात शिशु विभाग प्रमुख एल. एस.देशमुख, उपाधिष्ठाता डॉ. सिराज बेग, डॉ. वर्षा रोटे यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते.

तीस ते चाळीस वयोगटात वाढतोय कॅन्सर याबाबत माहिती देताना डॉक्टर सरोजिनी जाधव म्हणाल्या की, सध्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेकदा महिला लाजेपोटी दाखवण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे महिलांनी त्यांना त्रास असल्यास तातडीने उपचार करून घेणे गरजेचे आहे. घाटीत आठवड्यातून दोन दिवस ओपी डि सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

घाटीत तपासणीच्या अत्याधूनिक मशिनरी

यावेळी बोलताना वर्षा ऋतू यांनी सांगितले की, गाठीत तपासणीसाठीच्या अत्याधुनिक मशीनरी आहेत त्यामुळे महिलांनी न घाबरता ब्रेस्ट कॅन्सरबाबत तपासणी करावी. सध्या चाळिशीच्या आत मध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात ब्रेस्ट कॅन्सर होत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे महिलांनी न लाजता घाटीत तपासण्यासाठी यावे, असे आवाहन रोटे यांनी केले आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement