मोठी बातमी: एच3 एन2 नव्या कोरोना विषाणूमुळे युवकाच्या मृत्यूची कारणे शोधण्यासाठी 10 जणांची वैद्यकीय समिती स्थापन


अहमदनगर2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

देशात आढळून आलेल्या “एच-3एन-2’नव्या कोरोना विषाणूच्या आजाराने अहमदनगरमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, संबंधित विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारणे शोधण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या यांच्या आदेशानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (15 मार्च)ला दहा जणांची वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारणे शोधून त्याचा अहवाल सादर करणार आहे.

Advertisement

अहमदनगर येथे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा कोवीड-19व “एच-3 एन-2’नव्या कोरोना विषाणूच्या आजारानेमृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नव्या व्हेरियंटचा पहिलाच मृत्यू अहमदनगर मध्ये झाल्यानंतर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मंगळवारी (15 मार्च) ला आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, सदर विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारणे शोधण्यासाठी सालीमठ यांच्या निर्देशानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ. सतीश फाटके, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वरिष्ठ भूलतज्ञं डॉ. दर्शना बारवकर -धोंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोर्डे, साईदीप हॉस्पिटलचे डॉ. एस .एम .दीपक, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ.स्वाती कराड, डॉ. शरद मोहरकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ .अभिजीत आवारे, डॉ. श्रीवास्तव यांची ही समिती असून, समितीने बैठक घेऊन महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास केला.

Advertisement

सदर विद्यार्थ्यांचा मृत्यू एच-3 एन-2’नव्या कोरोना विषाणूच्या आजाराने झाला आहे. असा निष्कर्ष मृत्यू अन्वेष समितीच्या बैठकीत काढण्यात आला आहे असे समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी बुधवारी सांगितले.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement