मोठी बातमी: अमर मुलचंदानी यांच्या 47 स्थावर मालमत्ता आणि 122.35 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता ईडीकडून जप्त


पुणे41 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड मधील व्यावसायिक अमर मुलचंदानी, विवेक अरन्हा, सागर सुर्यवंशी आणि इतर तसेच त्यांचे कुटुंबीय, संस्था यांच्या ४२९ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगच्या चौकशीत

Advertisement

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी )पुण्यातील ४७ स्थावर मालमत्ता आणि १२२.३५ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जप्त केल्या आहेत. सेवा विकास सहकारी बँकेची फसवणूक प्रकरणात मुलचंदानी हे बँकेचे माजी अध्यक्ष आहेत.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी ऑगस्ट 2021 मध्ये 429 कोटी रुपयांच्या सेवा विकास बँक कर्जाच्या फसवणुकी प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यावर आधारित

Advertisement

ईडीची ही कारवाई आहे. मुलचंदानी याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गेल्या वर्षी अटक केली होती. सहा महिने तुरुंगात काढल्यानंतर तो जामिनावर बाहेर आला होता. मुलचंदानी यांनी 2016 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक असलेले मुळचांदणी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी उपमहापौर आणि पीसीएमसी स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. सेवा विकास सहकारी बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचे ईडीच्या तपासात असे दिसून आले आहे.

बँकने कोणत्याही आर्थिक नियमांचे पालन न करता कौटुंबिक मालकीप्रमाणे बँक चालविली आणि कर्जे व्यवहार्य सुरक्षिततेशिवाय मंजूर केली गेली आहे. कर्जाची योग्यता तपासली गेली नाही. . 92 टक्क्यांहून अधिक कर्ज खाती नॉन-परफॉर्मिंग अ‌ॅसेट मध्ये बदलली आणि बँक दिवाळखोर झाली, असे तपास यंत्रणाने सांगितले आहे.

Advertisement



Source link

Advertisement