मोठी दुर्घटना टळली: संगमवाडीत शिवशाही बसचे ब्रेक निकामी; 25 प्रवासी बचावले


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Pune Sangamwadi ST Bus Accident Update Shivshahi Bus Brake Failure; 25 Passengers Escaped | Stealing Accused Arrested | Pune News

पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

शिवाजीनगरहून नगरकडे निघालेल्या शिवशाही बसचे ब्रेक निकामी झाल्याची घटना संगमवाडी परिसरात घडली. शिवशाही बस फूटपाथवर जाऊन झाडावर आदळल्याची घटना घडली.

Advertisement

सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी स्थानकातून शिवशाही बस नगरकडे निघाली होती. बसमध्ये २५ प्रवासी होते. संगमवाडी परिसरात बिंदुमाधव ठाकरे चौकात बसचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट पदपथावर जाऊन झाडावर आदळली. बसचा वेग फारसा नसल्याने प्रवाशांना दुखापत झाली नाही. मात्र, बसच्या धडकेने झाड कोसळले. सुदैवाने पदपथावर कोणी नसल्याने जिवीतहानी झाली नाही.

घरफोडी करणारे सराईत दोघे आरोपी जेरबंद, पावणेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Advertisement

घराचा दरवाजा तोडून कपाटातील सोन्या-चांदीचा ऐवज चोरी करणार्‍या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ लाख ८८ हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही घटना १० ते १६ मे दरम्यान वानवडीतील चिमटा वस्तीवर घडली होती.अभिषेक सुभाष जाधव (वय -२१) आणि मुयर महेंद्र मोरे (वय- २१ रा. चिमटा वस्ती, वानवडी,पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

फिर्यादी मुळ गावी आंध्रप्रदेशात गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून पावणेतीन लाखांचा ऐवज चोरुन नेला होता . दाखल गुन्हयाचे अनुषंगाने वानवडी तपास पथकाने संशयीतांची माहिती काढून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी घरफोडी करून चोरी केलेले एकुण ३६ ग्रॅम वजनाचे सोने, चांदीच्या पायपटया, मनगटी घड्याळ असा ऐवज जप्त केला.

Advertisement

ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक संदिप शिवले, उपनिरिक्षक संतोष सोनवणे, अतुल गायकवाड, अमजद पठाण, संतोष नाईक, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले, मनिषा सुतार, सोनम भगत यांनी केली.



Source link

Advertisement