मेहता माध्यमिक प्रशालेत‎ भूगोल प्रदर्शन उत्साहात‎: प्रदर्शनातील प्रकल्पांतून‎ विद्यार्थ्यांना भूगोलचे ज्ञान‎


सोलापूर‎3 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

मेहता प्रशालेतील भूगोल प्रदर्शनात‎ विद्यार्थ्यांनी विविधांगी माहितीचा‎ खजिनाच उलगडला. यात विविध‎ प्रांतातील शेती प्रकार, जागतिक‎ स्तरावरील विविध भौगोलिक व‎ वैशिष्ट्यपूर्ण अशा रचना,‎ तापमानवाढीचा जागतिक स्तरावरील‎ परिणाम, नैसर्गिक इंधन, साैर चूल‎ असे प्रकल्प मांडले होते. तसेच‎ राज्याची भौगोलिक वैशिष्ट्ये, विविध‎ ऐतिहासिक ठिकाणे, नकाशा वाचन,‎ वैशिष्ट्यपूर्ण उद्योग, भौगोलिक‎ प्रतिकृती यांचा समावेश होता.‎‎ प्रमुख पाहुण्यांनी प्रदर्शनाचे परीक्षण‎ केले.

Advertisement

यामध्ये विद्यार्थ्यांनी शेतीचे‎ प्रकार, सौर चूल, जागतिक तापमान‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वाढ, उद्योगांचे प्रकार अशा विविध‎ भौगोलिक विषयांच्या प्रतिकृती तयार‎ केल्या. याप्रसंगी शाळेच्या‎ मुख्याध्यापिका श्रुती बागेवाडी,‎ पर्यवेक्षिका सुस्मिता तडकासे, भूगोल‎ विभागाचे प्रमुख दीप्ती इंगळे आदी‎ उपस्थित होते.‌‎ विद्यार्थ्यांनी भूगोल विषयावर विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले ‎.‎

भूगोल पक्का असणारी‎ व्यक्ती इतिहास घडवते’‎ ‘भूगोल हा आपला सहजीवनाचा‎ विषय आहे. तसेच ज्याचा भूगोल‎ पक्का असतो, तो इतिहास‎ घडवतो’, असे प्रतिपादन लिटिल‎ फ्लाॅवर स्कूलमधील सहशिक्षक‎ अंबादास जाधव यांनी केले. भूगोल‎ प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन‎ श्री. जाधव आणि भूगोल प्रज्ञाशोध‎ परीक्षेत राज्यात प्रथम असलेला‎ आयुष गायकवाड यांच्या हस्ते झाले.‎

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement