मेसीसह सेंट-जर्मेनचे चार खेळाडू करोनाबाधितएपी, पॅरिस : सात वेळचा बॅलन डी’ओर पुरस्कार विजेता लिओनेल मेसीसह पॅरिस सेंट-जर्मेन फुटबॉल संघातील चार खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. युरोपातील विविध फुटबॉल स्पर्धावरील करोनाचे सावट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आघाडीपटू मेसी, बचावपटू जुआन बेर्नात, राखीव गोलरक्षक सर्जिओ रिको आणि १९ वर्षीय मध्यरक्षक नेथन बिटूमाझाला यांचा करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याचे सेंट-जर्मेन संघाने आपल्या निवेदनात म्हटले. साहाय्यकांमधील एका सदस्यालाही या विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. सेंट-जर्मेनचा सोमवारी फ्रेंच चषक स्पर्धेत व्हॅना संघाशी सामना होणार आहे. तसेच जर्मनीतील फुटबॉल संघ बायर्न म्युनिकमधील चार खेळाडूंनाही करोनाची बाधा झाली आहे. यात कर्णधार मॅन्युएल नॉयर, किंगस्ले कोमान, कॉरेन्टिन टोलिसो आणि ओमर रिचर्डस यांचा समावेश असल्याचे बार्यनकडून सांगण्यात आले. साहाय्यक प्रशिक्षक डिनो टॉपमोलेर हेसुद्धा करोनाबाधित आहेत.

Advertisement

The post मेसीसह सेंट-जर्मेनचे चार खेळाडू करोनाबाधित appeared first on Loksatta.Source link

Advertisement