मॅन्चेस्टर कसोटी रद्द; इंग्लंडला पाचव्या कसोटीचा विजेता घोषित, मालिका 2-2 ने बरोबरीत


Advertisement

India Vs England : भारत आणि इंग्लडमधील पाचव्या कसोटी सामन्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मॅन्चेस्टर येथे ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला असून इंग्लंडच्या संघाला या सामन्याचा विजयी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे ही मालिकी 2-2 अशा बरोबरीत सुटली आहे. 

त्या आधी पहिल्या दोन दिवसांचा खेळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. इंग्लंड अॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्डने हा सामना दोन दिवस पुढे ढकलत असल्याची घोषणा केली होती. जर रविवारी हा सामना खेळवण्यात आला नाही तर हा सामना रद्द करण्यात येणार असल्याचंही इंग्लंड अॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्डने स्पष्ट केलं होतं. आता हा सामनाच रद्द केल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.  

Advertisement

त्या आधी या सामन्याचा कमेंटेटर दिनेश कार्तिकने एक ट्वीट करत पहिल्या दोन दिवसांचा खेळ होईल की नाही यावर शंका उपस्थित केली होती. 

 

Advertisement

भारतीय संघाचे सहाय्यक फिजियो यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर भारतीय संघाची ट्रेनिंग रद्द करण्यात आली आहे.  खबरदारीचा उपाय म्हणून सर्व भारतीय खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्यांना हॉटेलमध्ये आयोसोलेट केले आहे.  गुरुवारी यावर बोलताना भारतीय क्रिकेट बोर्डाचे प्रमुख सौरव गांगुली म्हणाले होते की, ” पाचवा कसोटी सामना होईल की नाही या बाबत शंका आहे. हा सामना होण्याची शक्यता फारच कमी आहे.”

Advertisement

संबंधित बातम्या : 

Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here