मॅनेजमेंट फंडा: ‘नजरेने नियंत्रित’ लोकसंख्या अधिक चांगली वागते का?


औरंगाबादएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

त्या काळात आईचे डोळे रिमोट कंट्रोलसारखे होते. पहिली ओळ वाचून धक्का बसला का? इतर काहीही विचार करण्यापूर्वी तुमचे बालपण आठवा. लक्षात ठेवा, तुम्हाला भटक्या कुत्र्याला अन्नाचा शेवटचा तुकडा खायला द्यायचा होता तेव्हा आई डोळ्यांनी कशी परवानगी द्यायची. तुकडा खाली पडल्यावर त्याच डोळ्यांनी आई नकारही द्यायची आणि कुत्रा चावण्याची भीती असायची. तुकडा उचलल्यावर आई रागावायची आणि हात धुऊन आल्यावर ती हसायची. या दरम्यान एक शब्दही बोलला जात नसे, पण आपण आईला हवे तेच करत असू. म्हणूनच मी म्हणतो की, आईचे डोळे तुमच्या सार्वजनिक वर्तनासाठी योग्य रिमोट कंट्रोल आहेत. आपण लहानपणी आईच्या डोळ्यांच्या वाचनाच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचो व नोकरीपूर्वीच त्यात पीएचडी होत असे. मग आपण ट्रेनने प्रवास करू लागलो, जिथे प्रवासी एकमेकांसमोर बसतात. वर्ग कोणताही असो, आपण त्यांच्याकडे पाहून हसतो. आईने दिलेले अन्न अनोळखी सहप्रवाशांसह वाटून खातो. आपण त्यांना विचारतो, ‘हे माझ्या आईने खास बनवले आहे, तुम्हाला खायला आवडेल?’ ते सुरुवातीला नकार देतील, पण पुढच्या २४ तासांत ते फक्त त्यांचे खाणे वाटून घेण्यास सुरुवात करत नाहीत, तर आता तुम्हा दोघांनाही एकमेकांच्या संपूर्ण कुटुंबाबद्दल माहिती झालेली असते. इथे काही विभक्त संबंधदेखील सापडण्याची शक्यता आहे. बहुतांश लोक वृद्ध प्रवाशांना पाणी, अन्न इ. आणण्यासाठी मदत करतात. अनेकदा मुलांनाही मदत करतात. आपण अशी चांगली कामे करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीचे डोळे खूप काही सांगून जातात. ते एकही शब्द न बोलता ‘धन्यवाद’ म्हणतात आणि म्हणतात, ‘मला असा जबाबदार जावई किंवा सून मिळाली तर…’ त्यांच्या डोळ्यात हे शब्द वाचू शकता आणि नंतर त्या प्रवाशाला प्रभावित करण्याचा अधिक प्रयत्न करू शकता. प्रवासातील हे नाते टिकत नसले तरी आपण प्रत्येक प्रवासात ते करतो, कारण आपल्याला सहप्रवाशाच्या डोळ्यात कौतुक दिसते. आणि या नजरेनेच एक चांगला नागरिक बनण्याची किंवा चांगल्या समाजाचा भाग बनण्याची इच्छा आपल्यात निर्माण केली.यामुळे मनात विचार आला की, आपण हवाई प्रवास करतो तेव्हा काय होते? लोक इतके मद्यपान का करू लागले की त्यांनी स्वैराचाराचा अवलंब केला? याची अनेक कारणे असू शकतात. विमानातील आसने एकामागे एक असतात. कोणीही एकमेकांच्या डोळ्यात पाहू शकत नाही कोणी पाहत नसल्याने आपण स्वच्छंद होतो. मला आठवते की, छोट्या विमानात पहिल्या दोन रांगांतील प्रवासी समोरासमोर बसतात. अशा कोणत्याही प्रवासात मला अस्वस्थता जाणवली नाही. अनेक वेळा आमची नजरानजर झाली आणि आमचे सार्वजनिक वर्तन चांगले व कौतुकास्पद असावे, अशी आमची इच्छा होती. आपल्याला आपल्या आईच्या नजरेच्या नियंत्रणात राहण्याची सवय असेल, तर इतरांच्या नजरादेखील आपल्यावर नियंत्रण ठेवू शकतात, म्हणजेच आपण त्यांच्या नजरांसाठी चांगले वागू शकतो. फंडा असा की, आपण अजूनही ‘नजरेने नियंत्रित’ लोकसंख्या राहू इच्छित असू, तर मी सुचवतो की, विमानातील जागा एकमेकांसमोर असाव्यात. कदाचित ‘डोळ्यांची लाज’ आपले सार्वजनिक वर्तन चांगले करू शकेल. तुमचे मत काय आहे?

Advertisement

एन. रघुरामन, मॅनेजमेंट गुरू [raghu@dbcorp.in]

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement