अमरावती4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
अवघ्या दोन दिवसावर येवून ठेपलेल्या लग्न सोहळ्याअगोदरच काळाने झडप घेतल्यामुळे बाबुरावजी निंभोरकर यांचा एकुलता एका मुलाची प्राणज्योत मालवली. नवरदेव होण्याचे बेत आखले जात असतानाच नियतीने त्याला कुटुंबीयांपासून हिरावून नेले. अस्वस्थ वाटल्यानंतर त्याला रुग्णालयात नेल्यानंतर भावी नवरदेवाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारणअजून स्पष्ट झाले नाही.
मुलाचे लग्न जुळल्यामुळे निंभोरकर कुटुंब अगदी आनंदी होते. लग्नाच्या दोन दिवस अगाेदरपर्यंत नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका देणे, मित्र मंडळींना पत्रिका देणे अशी कामे सुरु होती. या सर्व बाबींमुळे गोलू अचानक आपल्याला नेहमीसाठी सोडून जाईल, असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अखेर झाले तसेच सायंकाळच्या सुमारास घरी हळदीचा व भोजन पार्टीचा कार्यक्रम आयोजित केला होता.
शंभर लोकांसाठी जेवणाचा बेतही आखण्यात आला होता. त्यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण होते. अशातच दुपारच्या सुमारास गोलू याला अस्वस्थ वाटू लागले. त्याचा मित्र प्रितम गाडबैल याने त्याला नेहमीप्रमाणे मोर्शी येथे दवाखाण्यात नेले. त्यानंतर डॉक्टरांनी उपचारही केला. सायंकाळपर्यंत गाेलुची प्रकृती ठिक होईल, असे सांगितले जात होते. परंतु गोलुची प्रकृती अधिक बिघडत गेली.
शेवटी त्याला पुढील उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ही घडामोड सुरु असतानाच गोलुने आपले प्राण त्यागले होते.
अमरावतीच्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी तालुक्यात पसरताच लोकांनी घरी एकच गर्दी केली. आनंदी वातावरण अचानक दु:खात बदलले. दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजताच्या सुमारास त्याचे पार्थीव जामगांवात आणले. यावेळी त्याची आई राजकन्या, मोठी बहीण सोनू, लहाण बहीण तेजू यांनी एकच हंबरठा फोडला. घरी उपस्थित प्रत्येकाच्याच डोळ्यांना अश्रूंनी वाट मोकळी करुन दिली होती.