मुसळधार पावसाने येडेश्वरी कारखान्यातील 30 हजार पोते साखर भिजली !


बीड – बीड Beed जिल्ह्यात यंदा मान्सूनने जोरदार सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस Rain पडला आहे. त्यामुळे अनेक नद्या River आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. Heavy rains soaked 30,000 bags of sugar in Yedeshwari factory 

Advertisement

मंदिरात चोरी केल्यानंतर चोरटे तासाभरात पोलिसांच्या जाळयात

मात्र असे असताना एकीकडे याच मुसळधार पावसाने, बीडच्या केज Kej तालुक्यात असणाऱ्या, येडेश्वरी Yedeshwari सहकारी साखर Sugar कारखान्यातील Factory तब्बल 30 हजार साखरेची पोती भिजली आहेत. त्यामुळे कोट्यावधींचे नुकसान Damage झाले आहे.

Advertisement

बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या आनंदगाव येथील, येडेश्वरी साखर कारखान्याने 6 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले होते. दोन दिवसांपूर्वी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे येडेश्वरी कारखान्याचा परिसरात पाणीच पाणी झाले.

हे देखील पहा –

Advertisement

यामुळे कारखान्याच्या 1 लाख 73 हजार 208 क्विंटल साखर साठवणुकीची क्षमता असणाऱ्या गोदामात पाणी शिरले. या पाण्यात गोदामातील 30 हजार पोते म्हणजे तब्बल 15 हजार क्विंटल साखर भिजली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisement

यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. गोदमातील पाणी काढण्यासाठी 40 ते 50 कर्मचारी प्रयत्न करत होते. मात्र 35 मिनिटात तब्बल 130 मिमी इतका पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गोदामात जमा झाले होते. त्यामुळे पाणी बाहेर काढायला अडचणी आल्या अशी माहिती गोदाम व्यवस्थापकांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

Advertisement



Source link

Advertisement