नागपूर15 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
कौटुंबिक वादातून दोन मुलांना विष पाजून बापाने स्वत: आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 16) रोजी नागपुरात उघडकीस आली. आपल्या दोन निरागस मुलांना जेवणात पित्याने विष कालवले. यात मुलीचा मृत्यू झाला तर मुलगा जीवन – मरणाच्या दारात आहे. ही हृदयद्रावक घटनेने समाजमन सुन्न झाले असून मुलांना मारल्यानंतर पित्याने आत्महत्या केली.
मुलं राहायची आईकडे
वाठोडा येथील वैष्णवदेवी नगरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या 45 वर्षीय मनोज बेळे यांचा पत्नी प्रियासोबत कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे दोघे वेगळे राहत होते. परस्पर करारानुसार या दाम्पत्याचा 12 वर्षांचा मुलगा प्रिन्स आणि 7 वर्षांची मुलगी तनिष्का त्यांच्या आईसोबत राहत होते.
15 दिवसांतून एकदा वडीलांकडे जायचे
वडीलांकडे दोन्ही मुले आठवड्यातून एकदा वडिलांना भेटायला जायची. रविवार 15 जानेवारीला त्याच दिवशी मुलांचे आजोबा त्यांना त्यांच्या वडिलांकडे सोडून गेले होते. त्याच दिवशी आरोपी मुलांचे वडील मनोज बेळे यांनी आपल्या दोन्ही मुलांना जेवणात विष टाकून आणि गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
मुलगा जीवन – मरणाच्या दारात
दोन्ही मुलांना मारण्याचा प्रयत्न करुन आरोपीने घरात गळफास घेतला. परिसरातील लोकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी दोन्ही मुलांना वैद्यकीय रुग्णालयात नेले. मुलीचा मृत्यू झाला तर मुलगा वैद्यकीय रुग्णालयात अजूनही जीवन-मरणाची लढाई आहे.
सप्टेंबर 2022 मध्येही असाच प्रकार
यापूर्वी 2 सप्टेंबर 2022 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बाेर्डा येथील संजय श्रीराम कांबळे याने त्याच्या दोन मुलांची विष पाजून हत्या केली होती. बेरोजगारीने त्रस्त झालेल्या संजय कांबळे याने 3 वर्षाची मिष्ट्री व 5 वर्षाच्या अस्मिन यांना जेवणातून विष पाजून मारले होते. बेरोजगारीने त्रस्त असलेला संजय कांबळे मानसिक तणावाखाली राहात होता. त्यातूनच त्याने आपल्याच दोन मुलांची हत्या केली होती.