मुलगी पोलिस होण्याआधीच पित्याचा मृत्यू!: पोलीस भरतीसाठी मुलीला सोडल्यानंतर रस्ता ओलांडताना अपघात, फुटपाथवर काढली होती रात्र


पुणे32 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नाशिक येथून मुलीस पोलीस भरतीसाठी पुण्यात घेऊन आलेल्या एका पित्याला रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाने धडक दिल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पुण्यातील शिवाजीनगर भागात घडली. सुरेश सखाराम गवळी (वय – 55, मुळ रा. नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

Advertisement

सध्या पोलिस भरतीसाठी राज्यातील विविध भागातून तरूण-तरूणी त्यांच्या पालक आणि मित्रांसोबत पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या ग्राऊंडवर मोठ्या संख्येने येत आहेत.सोमवारी सकाळी पोलिस भरतीसाठी मुख्यलायाच्या ग्राऊंडवर मुलीला सोडून चहा पिण्यासाठी, रस्ता ओलांडून जात असताना अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने सुरेश गवळी यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचे नाशिकचे रहिवाशी असलेले सुरेश गवळी हे रिक्षाचालक म्हणून काम करत होते. पत्नी आणि 22 वर्षीय मुलीला घेवुन ते रविवारी रात्री दहा वाजता पुण्यात शिवाजीनगर भागात आले होते. पुण्यात त्यांचे कोणीही नातेवाईक नसल्याने त्यांनी शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या बाहेरील रस्त्यावर फुटपाथवर कुटुंबियांसह रात्री काढली. सोमवारी भरतीसाठी त्यांच्या मुलीचे मैदानी चाचणी होती.

Advertisement

पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलीला पोलीस ग्राऊंडच्या गेटवर सोडले आणि ते पत्नीला सांगुन जवळच चहा पिण्यासाठी निघाले. तेथून काही अंतरावर पायी चालत गेल्यानंतर रस्ता ओलांडताना अनोळखी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांची पत्नी रेश्मा याकाही अंतरावर असल्याने त्यांनी अपघात झाल्याचे पाहिले आणि त्या पळत सदर ठिकाणी आल्या. दरम्यान, परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली.

दरम्यान, गवळी हे रक्ताच्या थारोळयात पडले होते आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविचछेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement