नाशिकएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पुरातन पायऱ्या १५ दिवसात बांधून देण्याचे आश्वासन स्मार्टसिटीच्या अधिकाऱ्यांनी दिले हाेते. मात्र १५ दिवसापेक्षा अधिक काळ उलटल्यानंतरही येथे काहीच काम झालेले नाही. स्मार्टसिटीच्या अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासन दिले जाते मात्र प्रत्यक्षात काेणतेही काम केले जात नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनच्या वतीने गाेदाकाठ परिसरात प्राेजेक्ट गाेदा ब्युटीफिकेशन अंतर्गत विविध कामे केली जात आहे.
याकामासाठी राज्य पुरातत्त्व विभागाने संरक्षित केलेल्या नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पायऱ्या थेट जेसीबीच्या मदतीने ताेडण्यात आल्या हाेता. या प्रकारामुळे गाेदाकाठाचा इतिहास पुसला जात असल्याने संतप्त गाेदाप्रेमी, सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध करत आंदाेलन करण्यात अाले हाेते. याच पार्श्वभूमीवर स्मार्टसिटीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत सीईअाे सुमंत माेरे यांनी पायऱ्या बांधण्याचे काम पंधरा दिवसात करण्याचे अाश्वासन दिले हाेते. तसेच याबाबत त्या ठिकाणी पाहणी दाैराही केला हाेता. अशी परिस्थिती असतांना या पायऱ्या बांधण्याबाबत पंधरा दिवसापेक्षा जास्त दिवस हाेवूनही काेणतेही काम झालेले नाही