मुख्य मार्गावरील अतिक्रमणाचा सुपडा साफ!: महापालिकेच्या पथकाची कारवाई, स्वत: अतिक्रमण काढण्याचे प्रशासनाचे आवाहन


अकोला44 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने सोमवार (दि. १३) पासून पुन्हा मुख्य मार्गावर धडक अतिक्रमण राबविण्याची मोहिम सुरु करण्यात आली. जुना राष्ट्रीय महामार्ग तसेच हरिहरपेठ मार्गावरील अतिक्रमणाचा अतिक्रमण हटाव पथकाने सफाया केला. दरम्यान ज्या व्यावसायीकांनी रस्त्यालगत अतिक्रमण केलेले आहे, त्यांनी आपले अतिक्रमण स्वत: काढावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement

महापालिका प्रशासनाने शहरातील गजबजलेले रस्ते आणि विस्कळीत वाहतुक हे चित्र लक्षात घेवून नोव्हेंबर महिन्यापासून मुख्य मार्गावर सतत अतिक्रमण हटाव मोहिम राबविणे सुरु केले आहे. शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर ही मोहिम राबविण्यात आली. मात्र अतिक्रमण हटाव मोहिम परतल्या नंतर पुन्हा अतिक्रमण जैसे-थे होते. परिणामी ही मोहिम प्रशासनाने सातत्याने सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी जेल चौक ते लक्झरी बसस्थानक चौक ते वाशिम बायपास चौक ते हरिहरपेठ मार्गावर अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. मोहिमे दरम्यान रस्त्यालगत उभारलेले टिनशेड, पान टपऱ्या, चहाची दुकाने, व्यावसायीकांनी बांधलेल्या पायऱ्या आदी जमिनदोस्त करण्यात आल्या. दरम्यान एका ठिकाणी कारवाई दरम्यान थोडाफार वाद झाला होता. मात्र हा वाद शमला.

Advertisement

ही कारवाई अतिक्रमण विभागाचे सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, वैभव कवाडे, सै.रफीक, योगेश कंचनपुरे, स्‍वप्‍नील शिंदखेडकर, मनपा विद्युत विभागाचे विजय यादव, महेंद्र रोकडे, हरिहर घोडके, मनोहर मसके, गजानन मेंगे, गजानन बोरडे व अभिकर्ता चे अजिंक्‍य खाडे, नागेश हिरोळे, विशाल खंडारे, हरिश बोंडे, सागर भागवत, प्रशांत झाडे, सुरज लोंढ, नितिन सोनोने आदींनी राबवली.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement